राज्यातील राजकारण सध्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका व्यक्तव्यामुळे ढवळून निघालं आहे. नुकतच मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. यावरून चांगलंच राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी – विरोधकांनी कोश्यारींवर टीकेचा भडिमार केला आहे.
विशेष बाब म्हणजे, कोश्यारींच्या वक्तव्यानंतर भाजपमध्येच दोन परस्पर विरोधी मतप्रवाह दिसून आले आहेत. भाजपने देखील कोश्यारींवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार आशिष शेलार राज्यपालांच्या भूमिकेबाबत असहमत असल्याचे म्हटले आहे.
मात्र असं असलं तरी देखील आमदार नितेश राणे यांनी कोश्यारींना समर्थन दिलं आहे. टीकेचा भडिमार होताच कोश्यारींनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला,’ असं कोश्यारींनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं आहे.
तर मुळ भाजप लोकांनी राज्यपाल विधान पासून स्वतः दूर केले. मात्र असं असलं तरी देखील दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांनी मात्र राज्यपालांना समर्थन दिलं असल्याच पाहायला मिळत आहे. भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांना समर्थन दिलं आहे.
नितेश राणे यांनी राज्यपालांना समर्थन देताना ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.