नवीन वर्षाची भेट म्हणून आसाम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी जानेवारी महिन्यात दोन दिवसांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. आसाम सरकारने कर्मचाऱ्यांना ६ आणि ७ जानेवारी २०२२ रोजी दोन दिवसांची सुट्टी दिली आहे. यासोबतच ८ आणि ९ जानेवारीला प्रासंगिक सुट्ट्या असल्याने एकूण सुट्ट्यांची संख्या ४ दिवसांवर पोहोचली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “६ आणि ७ जानेवारी २०२२ विशेष सुट्ट्या म्हणून नियुक्त केल्या आहेत आणि म्हणून मी आसाम सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या आई-वडिलांसोबत किंवा कुटुंबियांसोबत राहण्याची विनंती करतो. मी तुम्हाला दर्जेदार वेळ घालवण्याची विनंती करतो. तसेच मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पालकांच्या आशीर्वादाने नवीन आसाम आणि नवीन भारत निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे.”
या कालावधीत राज्य सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या आई-वडील किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधीही देण्यात आली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. तर, ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील नाहीत. त्यांना ६ आणि ७ जानेवारी २०२२ रोजी विशेष रजेचा लाभ मिळणार नाही. पश्चिम आसाममधील बोंगईगाव येथे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला.
https://twitter.com/himantabiswa/status/1477647314961395716?s=20
खरंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ६-७ जानेवारीला सुट्ट्या दिल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या पदरात आता सलग चार सुट्ट्या पडल्या आहेत. कारण ६ तारखेला गुरुवार आहे आणि ७ डिसेंबरला शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार-रविवारची नियमित सुट्टी आहे. अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात थेट सलग चार सुट्ट्या पडणार आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यात तैनात असलेले मंत्री, आयएएस आणि आयपीएस अधिकारी देखील या रजेचा लाभ घेऊ शकतात. पण पोलिस अधीक्षक दर्जापर्यंतच्या पोलिस अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय कर्मचारी ही रजा घेऊ शकत नाहीत. पण नंतरच्या तारखेला ते याचा लाभ घेऊ शकतात. ही सुट्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे
शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, सशस्त्र दल विशेष शक्ती कायदा हटवण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मध्ये काही सकारात्मक बदल दिसून येतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, ते २०२२ हे आशेचे वर्ष म्हणून पाहतात. ते म्हणाले की, आसाममधून लष्कर जवळजवळ मागे घेण्यात आले आहे आणि ते फक्त ५-६ जिल्ह्यांमध्ये तैनात आहे, त्यामुळे ही परिस्थिती चांगली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
भाकर दे म्हंटल्यावर सुनेनं सासूची मोडली बोटं, नवरा मध्ये आल्यावर त्यालापण दिली चापट
समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी
…आणि आयुक्तांना पाहून फुल विक्रेत्या महिलेचा मुलगा म्हणाला, ‘ए आई उठ ना गं, बघ सर आलेत’