देशभरात पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आह. त्यामुळे एक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कारकडे बघितले जात आहे. पण अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा केली आहे. (government ban on new electric scooter launch)
स्कूटरच्या आग लागण्याच्या घटना पाहता केंद्र सरकारने सध्या अशा नवीन वाहनांवर बंदी घातली आहे. या बनवणाऱ्या कंपन्यांना आगीच्या घटनांचा तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही नवीन वाहने लाँच करु नये, असा आदेश केंद्र सरकारने कंपन्यांना दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईव्ही निर्मात्यांना या घटनांचा तपास पूर्ण होईपर्यंत नवीन वाहने लॉन्च करण्यापासून परावृत्त करण्याचे तोंडी सांगण्यात आले आहे. स्कूटरच्या बॅचमध्ये आग लागल्याची घटना घडली असेल, तर त्या बॅचला परत मागवण्यात यावे, असे या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. अनेक कंपन्यांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे.
अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात जीवित व वित्तहानीही झाली आहे. हे पाहता कंपन्यांनी स्वत:हून अशी वाहने परत घेतली पाहिजे, असे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. गडकरींच्या विधानानंतर एका आठवड्यानंतर ओला, ओकिनावा आणि प्युअर ईव्हीने जवळपास ७,००० इलेक्ट्रिक वाहने परत मागवली आहेत.
सोमवारी झालेल्या बैठकीतही अशी वाहने परत आणण्याचे सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींबाबत कंपन्यांना सांगण्यात आले. या अंतर्गत केंद्र अशा वाहनांना बळजबरीने परत मागवू शकते आणि अशी वाहने बनवणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारू शकते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या कंपन्यांच्या स्कूटरला आग लागली नाही त्यांनाही विकलेली वाहने दुरुस्त करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने कंपन्यांना सुरक्षा शुल्क आकारणे आणि आगीच्या घटना टाळण्याबाबत ग्राहकांना त्या स्कूटरबाबत शिक्षित करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
National Language Controversy : अजय-सुदीपच्या हिंदी भाषेच्या वादावर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मल्टीबॅगर शेअर! ‘या’ स्टील पाईप कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला 737 टक्क्यांच्या परतावा
या’ निर्णयाने सामान्यांच्या खिशाला आणखी झळ तर रामदेवबाबा व अदाणींच्या संपत्तीत तुफान वाढ