narayan rane : काही दिवसांपूर्वीच भाजप नेते नारायण राणे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रभादेवी येथे शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाल्याच पाहण्यास मिळाला होता. याच प्रकरणावरून राजकारण देखील तापलं होतं.
राणे यांनी सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. माध्यम पत्रकरांशी बोलताना राणे यांनी त्यांच्या खास शैलीत शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. ‘मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल, असा जणू इशाराच नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला.
यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी राणे यांना प्रतिउत्तर दिलं आहे. राणेंनी आणि त्यांच्या मुलांनी बॉडीगार्ड नसताना महाराष्ट्रात फिरुन दाखवावे, असं प्रती आव्हान गौरीशंकर खोत यांनी दिलं आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटल्याचे बोललं जातं आहे.
माध्यमांशी बोलताना गौरीशंकर खोत यांनी राणे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. शिवसैनिकांना महाराष्ट्रात आणि मुंबईत फिरणे कठीण होईल असे म्हणणाऱ्या नारायण राणेंनी आणि त्यांच्या दोन मुलांनी बॉडीगार्ड नसताना फिरुन दाखवावे, असं ओपन चॅलेंज खोत यांनी दिलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना गौरीशंकर खोत यांनी म्हंटलं आहे की, ‘राणे यांनी ज्या पद्धतीने तत्परता दाखवली आहे, त्यानुसार ते भाजपाचे आहेत की शिंदे गटाचे असा सवाल सर्वसामान्यांचा पडला असल्याचा टोला खोत यांनी लगावला. यावर आता नारायण राणे आणि त्यांचे पुत्र काय प्रतिउत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय..?
गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला. दोन्ही गट आमने – सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. ठाकरे गटातील शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या.
यालाच प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणानंतर वातावरण आणखीच चिघळलं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला. अन् दोन्ही गटातील वाद पोलिसांनी मिटवला. मात्र याच प्रकरणाचा पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहे.