Share

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहील्यानगर करून स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा; पडळकरांचे आव्हान

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘ अहिल्यादेवी नगर ‘ करा अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. त्याचबरोबर, नामांतर करुन आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करण्याचे आवाहनही पडळकर यांनी केले आहे.

“हिंदुराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपुर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. मुसलमान राजवटीमध्ये हिंदुसंस्कृती, मंदिरे लुटली आणि तोडली गेली. तेव्हा अहिल्यामातेने हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकून जीर्णोद्धार केला. ज्या जिल्हयात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करावे, अशी तमाम अहिल्याप्रेमींची भावना असल्याचे पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

आपण आता मुघालशाही की होळकरशाहीच्या इतिहासाचा वारसा सांगणार? बहुजन समाज आता जागा झाला असून संघटित झाला आहे, हे आपण लक्षात ठेवा, असा इशारा पडळकर यांनी पत्रात दिला आहे. त्याचबरोबर, त्यांनी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनाला जाण्यासाठी पोलिसांनी अडवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा – पुतण्याच्या मुघालशाहीने पोलिस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास अडवले. त्यांना राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो”, अशी खोचक टीका पाडळकर यांनी केली आहे.

पुढे पडळकर म्हणाले की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर ‘ करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या, जय मल्हार. ” असे ट्विट पडळकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली
क्रिकेटपटू दीपक चहर अडकला लग्नबेडीत, लुक पाहून चाहते घायाळ; पहा लग्नातील सुंदर फोटो
कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण; स्वस्तात जेवनाचे आमिश दाखवून लुटले पैसे अन् दागिने

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now