Share

गोपीचंद पडळकर यांच्या भावाच्या गाडीचा अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल

राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत आहे. असे असतानाच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. (gopichand padalkar brother accident)

अपघातानंतर ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. ब्रम्हानंद पडळकर यांचा हा अपघात सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर झाला आहे. कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पोने ब्रम्हानंद पडळकर यांच्या कारला धडक दिली आहे.

हा अपघात खुपच भीषण होता. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरही गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्या ड्रायव्हरसोबत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सगळ्यांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मालवाहू पिकअप गाडीतील चालकही गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे विटा कुंडल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच आमदार गोपीचंद पडळकर हे आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले. घटनास्थळी विटा स्टेशन पोलिस निरीक्षक संतोष डोके आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर ते याप्रकरणी चौकशी करत आहे.

या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्या पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ब्रम्हानंद पडळकर यांना उपचारासाठी विटा येथून सांगली येथे आणण्यात आले आहे. तसेच हा अपघात नक्की कसा झाला? याबाबत पोलिस चौकशी करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईला हारताना बघून रोहित शर्मावर संतापला ‘हा’ दिग्गज खेळाडू; म्हणाला, जसप्रीत बुमराहच्या…
आदित्य ठाकरेंनी काकविरोधात उघडपणे थोपटले दंड, म्हणाले ‘मी स्टंटबाजीला…’
मला हिंदीत काम करण्याची गरज नाही, तेलुगू चित्रपट जगभर पाहिले जातात; साऊथ सुपरस्टारच्या उत्तराने लोकं हैराण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now