Share

शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप

sharad pawar

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची 297वी जयंती आहे. दरवर्षी राज्यभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. कर्जत-जामखेडमध्ये देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दणक्यात साजरी केली जाते.

याचे कारण असे की, जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालाय. या निमित्त चोंडी येथे जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजकारण तापलं आहे.

‘ही अहिल्यादेवींची जयंती नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे,’ अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमावस्येच्या निमित्ताने गोपीचंद पडळकर जेजुरीत आले होते. यावेळी माध्यमांशी गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी बोलताना पडळकरांनी पवारांना टार्गेट करत धनगर समाज यशवंत होळकरांच्या किल्ल्याची मागणी करत अल्याचं म्हटलं आहे. मात्र, पवार हा किल्ला फुकट वापरत असल्याचा खळबळजनक आरोप पडळकरांनी केला आहे.

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या. काठेवाडीच्या जमिनीचे मिळालेले पैसे होळकरांच्या कुटुंबाला मिळाले नाहीत. ते पैसे सुद्धा पवारांनीच ढापलेत, होळकरांच्या जमिनीवर पवारांचा डोळा आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, तर दुसरीकडे कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहे.  राम शिंदे म्हणाले, ‘प्रशासनावर दबाव टाकून राष्ट्रवादीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाची आम्हाला परवानगी दिली नाही. जयंतीनिमित्त मी दरवर्षी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करतो, त्याला रोहित पवारांकडून आडकाठी आणण्यात आली.’

‘चौंडी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी हडपली,’ असल्याच राम शिंदे यांनी म्हंटलं आहे.  ‘रोहित पवारांचे हस्तकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणत वाळू उत्खनन केले. याचबरोबर याठिकाणी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी प्रशासनाला हाताशी धरून हडप केली आहे, असा खळबळजनक आरोपही राम शिंदे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून एका पित्याने ‘असा’ रचला कट; वाचून बसेल जबर धक्का

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now