गुगल ही जगातील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी आहे. त्यामुळे तिने काहीही केले तरी ती नेहमीच चर्चेत येत असते. आता गुगलने त्यांच्या कामासाठी नवी मुंबईत एक जागा घेतली आहे. विशेष म्हणजे मुंबई सोडून नवी मुंबईत गुगलने जागा घेतली आहे.
गुगलने २८ वर्षांसाठी भाडे तत्वावर ही जागा घेतली आहे. याबाबत त्यांनी करारही केला आहे. गुगलचा पुढच्या दोन वर्षांमध्ये नवी मुंबईत डेटा सेंटर करण्याचा मानस आहे. त्यामुळे गुगलने भाड्याने ही जागा घेतली आहे.
गुगलने भाडे तत्वावर घेतलेली ही जागा महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमधील आहे. गुगलने ३.८१ चौरस फुट जागा डेटा सेंटरसाठी घेतली आहे. रेडेन इन्फोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गुगल इंक कंपनीने आमथिन इन्फो पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जागा घेतली आहे.
या जागेचं महिन्याचं भाडं ८.८३ कोटी रुपये असणार आहे. तसेच या भाड्यात वर्षाला १.७५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. २८ वर्षांसाठी हा करार केला गेला आहे. कराराची सर्व प्रक्रिया सुद्धा पुर्ण झाली असून लवकरच गुगल डेटा सेंटर उभारण्यास सुरुवात होणार आहे.
तसेच दोन्ही कंपन्यांनी याबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. ऑक्टोबर २०२२ मध्येच या करारावर स्वाक्षरी झाल्याचे म्हटले जात आहे. गुगलचे डेटा सेंटर दोन वर्षांत सुरु होणार असून त्यासाठी ८ मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
या करारानंतर कंपनीने ७ कोटी रुपये आता भरले आहे. तसेच यासाठी त्यांनी २६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क सुद्धा भरले आहे. गेल्यावर्षी गुगलने १० वर्षांसाठी सुमारे ४.६४ लाख चौरस जागा भाड्याने घेतली.
महत्वाच्या बातम्या-
शिंदे गटातील बड्या नेत्याचा ५०० कोटींचा घोटाळा; जावयासह सासऱ्यांनाही बेड्या पडणार
वारसा असतानाही रितेश राजकारणात का नाही आला? अखेर रितेशने स्वतःच उघड केले खरे कारण
कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु