शिंदे गटातील आमदार हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता शिंदे गटातील महत्वाचे नेते अर्जून खोतकर हे चर्चेत आले आहे. एका घोटाळ्याप्रकरणी अर्जून खोतकर यांचे जावई आणि भारतीय अंडर १९ संघाचे माजी कर्णधार विजय झोल यांना अटक होण्याची शक्यता आहे.
विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खरात हे घनसावंगी तालुक्यातील रहिवासी आहे. ते क्रिप्टो करंसीमध्ये काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे याप्रकरणी आता अर्जुन खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता आहे. किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. ते काम करत असताना त्यांना बीएमडब्ल्यु कार देखील मिळाली होती. त्यामुळे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते.
क्रिप्टो करंसीमध्ये विजय झोल यांनीही पैसे गुंतवले होते. पण जागतिक मंदी आल्यामुळे अनेकांचे पैसे बुडाले. विजय यांचेही पैसे बुडाल्यामुळे त्यांनी किरण खरात यांना किडन्याप केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किरण खरात यांनी पोलिसांत धाव घेतली.
किरण यांनी झोल यांच्यावर आरोप केले आहे. ते म्हणाले की झोल यांनी प्रॉपर्टी बळकावली आहे. तर अर्जून खोतकर यांच्याकडून किरण खरात यांच्यावर ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता १० ते १५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विजय झोल हे भारताचे अंडर १९ च्या संघाचे कर्णधारही होते. त्यांनी किरण खरात यांना किडन्याप करुन बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या-
वारसा असतानाही रितेश राजकारणात का नाही आला? अखेर रितेशने स्वतःच उघड केले खरे कारण
शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाठवले स्वताचे नग्न फोटो, नंतर मुलांनी केलं असं काही की प्राचार्यालाही..
सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..