Share

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुढील दीड वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना येत्या दीड वर्षात दहा लाख लोकांची भरती करण्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मंगळवारी ही माहिती दिली. सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांचे हे निर्देश आले आहेत, असे पीएमओने म्हटले आहे. (Good news for the unemployed! 1 million government jobs)

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत असताना पंतप्रधानांचा हा निर्णय आला आहे. विविध सरकारी क्षेत्रातील रिक्त पदांचा मुद्दाही गेल्या काही काळापासून चर्चेत होता. येत्या १८ महिन्यांत १० लाख पदे भरण्यात येणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या प्रत्येक टीकेला ठोस उत्तर देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेची पुढील निवडणूक एप्रिल-मे २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे.

पीएमओने ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करण्याचे निर्देश दिले.” तसेच अधिक माहितीनुसार, विविध विभाग आणि मंत्रालयांकडून रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मागवण्यात आली होती.

वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाद्वारे जारी केलेल्या वेतन आणि भत्त्यांवर ताज्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या नियमित नागरी कर्मचाऱ्यांची (केंद्रशासित प्रदेशांसह) एकूण संख्या ३१.९१ लाख होती, तर एकूण मंजूर पदांची संख्या ४०.७८ लाख होती. त्यानुसार सुमारे २१.७५ टक्के पदे रिक्त होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा मुद्दा जोमाने उचलून धरला होता, मात्र भाजपने विरोधकांच्या हल्ल्याची धार बोथट केली आणि कल्याणकारी योजना आणि विकासासोबत हिंदुत्वाचे मुद्दे पुढे करून यश संपादन केले. सरकारच्या विविध कार्यक्रमांमुळे देशात उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे, असे सांगत भाजपने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आरोपही सातत्याने फेटाळून लावले आहेत.

विरोधक बेरोजगारीचा मुद्दा बनवत कायम मोदी सरकारची कोंडी करत असतात. मात्र, कोरोनाच्या काळात सरकारी विभागात गेल्या दोन वर्षांत फारशी भरती झालेली नाही आणि हजारो पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मोदींची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
३ लग्न, ४ मुलं आता बॉयफ्रेंडसोबत दिसली बीचवर मजा मारताना, अभिनेत्रीचे बिकीनीतले फोटो व्हायरल
कपिल देव यांच्या रागाचा बळी ठरला ‘हा’ भारतीय खेळाडू, म्हणाले, ‘तो काहीच कामाचा नाही’
पाकिस्तानी चाहत्यांनी देसी अंदाजात वाहिली सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली, फोटो पाहून डोळ्यातून येईल पाणी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now