महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेपोली परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातात एका लहान मुलासह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकच्या धडकेने कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघात इतका भीषण होता की, ट्रकमध्ये बसलेल्या लोकांनाही जीव गमवावा लागला. या अपघातात एक लहान मुलगाही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोवा-मुंबई महामार्गावर रायगड जिल्ह्यातील रेपोली परिसरात हा अपघात झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर झाले आहे. त्यांनी घटनास्थळाची पहाणी केली.
वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी कार रत्नागिरीतील गुहागर भागात वेगाने चालली होती. तर, ट्रक मुंबईकडे येत होता. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्ग पुन्हा खुला केला आहे. हा अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यु झाला. अपघात होताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली. नेमका हा अपघात झालाच कसा? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. ट्रक आणि बसचे अनेक अपघात झालेले आपण ऐकले असतील. हे अपघात इतके भीषण असतात की, गाड्यांचा चुराडा होता. अनेक जणांचा जागीच मृत्यु होतो. ट्रक ड्रायव्हर किंवा बस ड्रायव्हर अनेक तास ड्रायव्हिंग करत असतात त्यामुळे काही वेळेला त्यांना डुकली येते आणि गाडीवरचा ताबा सुटतो.
महत्वाच्या बातम्या
जिंकल्यानंतरही आनंद साजरा करायचा सोडून खूपच भडकला रोहित, ‘या’ कारणामुळे झाला ‘मुड ऑफ’
द्विशतक ठोकायचं मनातच नव्हतं, पण ‘या’ क्षणी बदलला निर्णय; शुभमन गिलने सांगीतले गुपित
शुभमन गिलचे जबरदस्त द्विशतक! उडवल्या किवींच्या चिंधड्या; मोडले अनेक दिग्गजांचे ‘हे’ विक्रम
“शरद पवारांना विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्या नेत्याला द्यायचं होतं, पण ऐनवेळी अजित पवारांनी…”






