पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. (goa former cheaf ministar laxmikant parsekar leaved BJP)
भाजपने गोव्यात काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजप पक्षातील तीन बड्या नेत्यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे भाजपच्या या तीन बड्या नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर (laxmikant parsekar) मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मांद्रे मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी लक्ष्मीकांत पार्सेकर इच्छुक होते. पण भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.
भाजपच्या आणखी एक नेत्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर अपक्ष लढणार आहेत. सावित्री कवळेकर या गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना भाजपने केपे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभुपाऊस्कर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मंत्री दीपक प्रभुपाऊस्कर सावर्डे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपने त्या मतदारसंघात गणेश गावकर यांना उमेदवारी घोषित केली आहे.
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आपवर टीका केली आहे. ‘दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या कल्पनेमुळे घराघरात पाणी पोहचलं आहे’, यात आपचं कोणतेही श्रेय नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. मगोपने तृणमूलसोबत केलेल्या युतीमुळे गोव्यात प्रचंड नाराजी आहे.
महत्वाच्या बातम्या
मनोहर पर्रीकरांच्या मुलाला भाजपने तिकीट का दिले नाही? गोव्याच्या मंत्र्याने केला मोठा खुलासा
मोठी बातमी! मनोहर पर्रिकरांच्या मुलाला भाजपने दिला डच्चू; भाजपची पहीली यादी जाहीर
निवडणूकीचा नाद सोड! अमित शहा आणि मोदींनी उत्पल पर्रीकरांना स्पष्टच सांगितले