Share

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा उत्पल पर्रीकरांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले..

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून तिकीट दिलेले नाही. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे, तर उत्पल पर्रीकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. (goa cm pramod sawant on utpal parrikar)

या मुद्यावरुन गोव्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच अनेकजण उत्पल पर्रीकरांवर अन्याय झाला आहे, असे म्हणत आहे. आता या प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाष्य केले आहे. भाजप त्यांना तीन मतदार संघाची तिकीटे द्यायला तयार होती, असा मोठा गौप्यस्फोट प्रमोद सावंत यांनी केला आहे.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी त्यांना ऑफर केलेल्या तीन जागांवर उमेदवारी देण्यास नकार दिला होता, असेही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

एका खास मुलाखतीत ते म्हणाले की, गोव्यातील भाजपची ही पहिलीच निवडणूक असेल, जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मनोहर पर्रीकर नसतील. हे माझ्यासाठी आव्हान आहे पण मला खात्री आहे की गोव्यात आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. गोव्यातील सर्व ४० जागा भाजप कोणत्याही युतीशिवाय लढवत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला की, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उत्पल पर्रीकर हे देखील निवडणुकीत मुद्दा बनले आहेत. विशेषत: पणजी मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. ते पक्षाचे वचनबद्ध कार्यकर्ते असते तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे ऐकले असते.

तसेच त्यांनी तिकीट घेतले नाही हे लोकांना कळायला हवे. आम्ही त्यांना लढण्यासाठी तीन जागा देऊ केल्या होत्या ज्या त्यांनी नाकारल्या, असेही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यापासून ते निवडणुकीच्या थीम साँगपर्यंत सर्वत्र मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती जाणवते.

महत्वाच्या बातम्या-
Third covid wave: ‘या’ महिन्यात संपणार कोरोनाची तिसरी लाट, ICMR ने केली मोठी भविष्यवाणी
हिंदुस्थानी भाऊला पालकांनी झापले; म्हणाले, ‘तू सातवी शिकलेला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ले देतोस’
१ लाखाची लाच घेताना पकडलं तरी महिला अधिकाऱ्याचे हसू थांबेना; म्हणाली, प्रसादाला नाही कसं म्हणू

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now