कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधले राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा ही गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.
आज दोन्हीही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपने कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट काँग्रेसलाच ऑफर दिली आहे. पाटील यांच्या विधनाने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो’ अशी थेट ऑफरच चंद्रकांत पाटलांनी दिली.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते यावेळी बोलताना म्हणाले, ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो, असे मोठे विधान पाटील यांनी केले. तसेच जयश्री जाधव यांना आमदार करतो, असा सरळ प्रस्तावच पाटील यांनी सतेज पाटलांना दिला.
याचबरोबर अजूनही काही तास शिल्लक असून यावर निर्णय घेण्याचे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवरील कारवाईवर झाली आहे. आता या सरकारमधील काही जण सुपात आहेत तर काही जात्यात आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
”..त्यावेळी मनोहर जोशींनी बाळासाहेबांच्या सांगण्यावरून राजीनामा दिला होता, हाच नियम येथे लागू होतो का?”
धक्कादायक! पत्नी झोपेत असताना शेजारी झोपलेल्या पतीचा झाला खून, पोलिसांनी पत्नीलाच घेतलं ताब्यात
मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे..!, ईडीच्या धाडीनंतर मनसेनं उडवली शिवसेनेची खिल्ली
नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद