Share

प्लिज मला जाऊद्या… हातापाया पडत बिचारी तरूणी विनवणी करत होती, मात्र क्रुर गावकऱ्यांनी तिला….

प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अनेकदा गावात प्रेमी युगुलाला गावकऱ्यांनी मारल्याच्या घटनाही समोर येत असतात. आता अशीच एक घटना बिहारच्या गया जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे एका प्रेमी युगुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. (girl request villegers)

संबंधित प्रकरण कोंच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे कडाक्याच्या उन्हात शेताच्या काठावर निर्जन ठिकाणी गावकऱ्यांनी एका प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली आणि त्यांनी त्या जोडप्याला मारहाण केली.

सुरुवातीला गर्दीतून कोणीतरी त्या जोडप्याची जात आणि पत्ता विचारला. चुकीचे सांगितल्यामुळे त्याने तरुणाला चापट मारली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणीची जात विचारण्यात आल्याचे आणि नंतर पत्ता विचारण्यात आल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. यानंतर गावकरी दोघांचे लग्न लावण्याची चर्चा करतात, त्यावर मुलगी लग्नाला तयार होत नाही.

तरुण सांगतो की ती मुलगी त्याच्या भावाची मेहुणी आहे. जमावाने तरुणाच्या दुचाकीच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. चुकीची जात आणि पत्ता सांगून जमावातील काही गावकरी मुलीच्या चेहऱ्यावरून ओढणी ओढतात. त्यावर मुलगी गावकऱ्यांच्या पाया पडते आणि त्यांना सोडून द्या, अशी विनवणी करत होती.

गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला आहे आणि नंतर तो व्हायरल केला. गयाचे अतिरिक्त एसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात आली असून, तो गयाच्या कोंच पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

तेथे असलेल्या पीडितेच्या जबाबावरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ती तिच्या नातेवाईकासोबत गेली होती, तेव्हा वाटेत काही गावकऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेला शिवसेनेचा ‘दे धक्का’, बडा नेता सेनेच्या जाळ्यात
“कलम ३७० रद्द झाल्यास रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा दगडही मारू शकले नाहीत”
प्राजक्ताच्या बोल्ड भूमिकेवर तिच्या आईने थेट दिले होते ‘हे’ उत्तर; म्हणाली होती की, आलिया भटने…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now