सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले काही व्हिडिओ हे चांगलेच व्हायरल होत असतात. हाणामारीचेही व्हिडिओ अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (girl free style fighting video)
बंगळुरू येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाळेच्या गणवेशातील मुलींचे दोन गट एका शाळेसमोर एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण ही क्लिप इंटरनेटवर खूप व्हायरल होत चालली आहे.
ही घटना कधी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही, तसेच भांडणाचे कारणही समोर आलेले नाही. या भांडणात सहभागी झालेल्या मुलींचे गणवेश पाहून सोशल मीडिया यूजर्सचा असा विश्वास आहे की ही मारामारी दोन शालेय विद्यार्थीनीनींमध्ये झाली आहे. यापैकी एक बंगळुरूमधील प्रसिद्ध बिशप कॉटन गर्ल्स स्कूल आहे.
४२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांना चापट मारताना, केस ओढताना आणि मारहाण करण्यासाठी काठ्या काढताना दिसत आहेत. तसेच या ठिकाणी मुले देखील घटनास्थळी दिसत आहेत, जे कदाचित हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Y'all need to even if y'all haven't already 😭😭😭 pic.twitter.com/fBbJv9CXoc
— chef (@Trexhater) May 17, 2022
या क्लिपमध्ये मारामारीदरम्यान मुलींच्या रडण्याचा आवाजही ऐकू येतो. काही जण भांडण थांबवण्याचा प्रयत्नही करत आहेत. शूट केलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीलाही दुखापत झाल्याचे दिसून येते. या लढ्यात ना शाळेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला, ना त्यांच्या बाजूने कोणतेही निवेदन जारी करण्यात आले आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक ट्विटर युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यापैकी काही वापरकर्ते असेही आहेत, ज्यांनी ही घटना पाहिली. वादात अडकलेल्या एका विद्यार्थिनीच्या कथित मेसेजचा स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रचनाने तिला बिशप कॉटन गर्ल्स स्कूलमध्ये जाऊन एका मुलीला मारण्यास सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी वाजणार सनई चौघडा
पत्नीला मित्रांसोबत से’क्स करायला लावायचा आणि स्वत: पाहत बसायचा; पुण्यातील विकृत घटना
…म्हणून घरमालक नेहमी ११ महिन्यांचाच भाडे करार करतात; कारण ऐकून हैराण व्हाल