Share

गावस्करने हेटमायरच्या पत्नीवर केली ‘ही’ अश्लील कमेंट, संतापलेले चाहते म्हणाले, इतरांच्या बायकोवर..

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या सीजनमध्ये, राजस्थान रॉयल्स (RR) ने शानदार विजय नोंदवला आणि दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले. राजस्थानने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) ५ गडी राखून पराभव केला. याच सामन्यात समालोचन करणाऱ्या भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी राजस्थान संघाचा खेळाडू शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणीवर अश्लील टिप्पणी केल्याने सर्वत्र जोरदार टीका होत आहे. (Indian Premier League, Rajasthan Royals, Sunil Gavaskar, Shimron Heitmeyer)

वास्तविक, सामन्यात राजस्थान संघ १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान संघाने १५ षटकांत ४ गडी गमावून १०४ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचे खेळाडू शिमरॉन हेटमायर आणि रविचंद्रन अश्विन क्रीझवर उपस्थित होते. हेटमायर हा क्रीझवर येणारा नवा फलंदाज होता. राजस्थान संघाला विजयासाठी ३० चेंडूत ४७ धावांची गरज होती. यादरम्यान गावसकर यांनी हेटमायरच्या पत्नीबद्दल गमतीशीर टिप्पणी केली.

समालोचन करताना गावस्कर म्हणाले, शिमरॉन हेटमायरच्या पत्नीची डिलिव्हरी झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का? वास्तविक, हेटमायरच्या पत्नीने १० मे रोजीच मुलाला जन्म दिला. तेव्हा हेटमायर आपल्या पत्नीसह उपस्थित होते. सर्व काही ठीक झाल्यानंतर, हेटमायर भारतात परतला आणि संघात सामील झाला आणि गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला. मात्र, हेटमायरला या सामन्यात फारसे काही करता आले नाही आणि तो ६ धावा करून बाद झाला.

https://twitter.com/CricCrazyNikk/status/1527704861810102277?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527704861810102277%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsunil-gavaskar-distasteful-comment-on-shimron-hetmyer-wife-nirvani-gavaskar-trolled-during-csk-vs-rr-match-in-ipl-2022-tspo-1467649-2022-05-21

गावसकर यांनी खेळाडूंच्या पत्नीवर वादग्रस्त टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, आयपीएल २०२० दरम्यान देखील गावस्कर यांनी विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावर टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याने कोहलीच्या फॉर्मची खिल्ली उडवली, त्यानंतर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यावर टीका करत एक लांबलचक पोस्ट लिहिली. नंतर गावस्कर यांनी स्पष्ट केले की, त्यांचे विधान चुकीचे मांडण्यात आले आहे.

https://twitter.com/jenzbenzy/status/1527704728003833856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527704728003833856%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsunil-gavaskar-distasteful-comment-on-shimron-hetmyer-wife-nirvani-gavaskar-trolled-during-csk-vs-rr-match-in-ipl-2022-tspo-1467649-2022-05-21

https://twitter.com/ShouriPiratla/status/1527704447010283521?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527704447010283521%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsunil-gavaskar-distasteful-comment-on-shimron-hetmyer-wife-nirvani-gavaskar-trolled-during-csk-vs-rr-match-in-ipl-2022-tspo-1467649-2022-05-21

https://twitter.com/Chacha__Nehru/status/1527704036907941888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527704036907941888%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsunil-gavaskar-distasteful-comment-on-shimron-hetmyer-wife-nirvani-gavaskar-trolled-during-csk-vs-rr-match-in-ipl-2022-tspo-1467649-2022-05-21

गावस्कर यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. गावस्कर यांना कॉमेंट्रीमधून हटवण्याची मागणीही चाहत्यांनी केली. गावसकरांना सल्ला देताना एका युजरने म्हटले की, त्यांनी इतरांच्या पत्नींवर अशा प्रकारे अश्लील कमेंट करणे थांबवावे. युजरने विनम्रपणे म्हटले, सुनील गावस्कर सर, व्यावसायिक खेळात तुम्ही इतरांच्या बायकांवर विनोदी कमेंट का करता?

महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नच्या निधनानंतर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, त्याच्या हृदयाला
म्हणून शेन वॉर्न इतक्या लवकर गेला; वॉर्नच्या मृत्युवर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य
अनकॅप्ड खेळाडूंसाठी करोडोंची बोली लावल्याने सुनील गावस्कर संतापले; म्हणाले,  एका रात्रीतून मिळालेल्या
पुजारा-रहाणेचा खेळ खल्लास, त्यांच्या जागी येणार हे दोन फलंदाज, सुनील गावस्करांनी केले स्पष्ट

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now