Entertainment: आजकाल लावणी म्हंटल की गौतमी पाटील (Gautami Patil) असं समीकरण झालं आहे. लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. तसेच मागील काही दिवसांपासून गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना घडत असल्याने महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून करण्यात येत आहे.
या गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. मात्र आता आणखी एका वेगळ्याच कारणाने गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या लावणीच्या तालावर अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील आता चित्रपटात देखील दिसणार आहे.
गौतमीला कार्यक्रमांमध्ये पाहण्यासाठी लोक अगदी वेडे होतात. आता तर ती चित्रपटात दिसणार या बातमीनेच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. अगामी ‘घुंगरू’ या चित्रपटातून गौतमी पाटील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
इतकंच नाही तर या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पार पडले आहे. माढा, सोलापूर, हंपी आणि थायलंड या ठिकाणी घुंगरू या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाचे लेखन व निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द बाबा गायकवाड हेच गौतमी सोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
यामुळे गौतमी व बाबा गायकवाड यांची केमिस्ट्री कशी दिसेल हे पाहणे रंजक असणार आहे. लोककलावंतांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असून गौतमी व बाबा गायकवाड या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकार देखील हा चित्रपटात असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी”, कोरेगाव भीमा लढाईबद्दल केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य
‘उर्फी जावेदचे थोबाड फोडणार, हा नंगानाच महाराष्ट्रात खपवून घेणार नाही’; चित्रा वाघ कडाडल्या