Share

gautami patil : ‘काहीही झालं तरी मी माझे कार्यक्रम बंद पडू देणार नाही’; बंदीच्या मागणीवर भडकली गौतमी, म्हणाली…

gautami patil

gautami patil lawani dance  | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. ती लावणीच्या नावाखील अश्लील हातवारे करत नृत्य करते, अशी टीका वारंवार तिच्यावर होताना दिसून येत आहे. ती लावणी करताना चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याचे समोरही आले होते.

गौतमीच्या अश्लील डान्सची व्हिडिओ क्लीप सुद्धा व्हायरल झाली होती. जिथे गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम असतो. तिथे तरुणांची तुफान गर्दी असते. अशात सोलापूरातील एका कार्यक्रमात खुप गर्दी झाली होती. त्यामुळे तिथली जिल्हा परिषदेची शाळा पडली होती.

त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे. तसेच गौतमीची लावणी अश्लील आहे. असे म्हणत तिचे कार्यक्रम बंद पाडण्याची मागणी अनेकजण करत आहे. अशात काही लोकांनी तर गौतमीच्या लावणीवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.

माडा तालुक्यात पिंपळफुटा याठिकाणी गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. तिथे तिचा अश्लील डान्स बघण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत आहे. परिसरातील इतर गोष्टींवरही याचा परिणाम झाला होता. त्यामुळे तिची लावणी कायमची बंद करा अशा मागणीने जोर धरला आहे.

आता लावणी कायमची बंद करण्याच्या मागणीवर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी लावणी बंद होणार नाही. ग्रामीण भागातील लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. लोकांना माझे कार्यक्रम आवडतात, असे गौतमी पाटीलने म्हटले आहे.

मी बघतेय की काही लोक माझ्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. पण मी लावणी बंद होऊ देणार नाही. माझे कार्यक्रम लोकांना खुप आवडतात. त्यांचे माझ्यावर खुप प्रेम आहे. मध्यंतरी माझ्याकडून चुका झाल्या असतील. पण मी त्याची माफी मागितली आहे. पण मी कार्यक्रम बंद करणार नाही. लोकांनी माझाही विचार करावा. माझी काळजी कोणी करणार आहे की नाही? असे गौतमीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
rohit shetty : …म्हणून मी माझ्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना संधी देतो; रोहित शेट्टीने सांगितलं खास कारण
kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत
corona : कोरोनाची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या IIT कानपूरच्या प्राध्यापकाचे मोठे वक्तव्य; म्हणाले, भारतात लाॅकडाऊन…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now