rohit shetty on marathi actors | काही मराठी कलाकार हे आता मराठी चित्रपटसृष्टीनंतर बॉलिवूडमध्येही काम करताना दिसून येत आहे. बॉलिवूडमध्येही ते आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्कृष्ट अभिनयामुळे ते आपल्या हिंदी चित्रपटसृष्टतही आपले चाहते बनवत आहे. अशात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा नेहमीच मराठी कलाकारांना त्याच्या चित्रपटांना संधी देण्याचे काम करत असतो.
कॉमेडीसोबत भरपूर ऍक्शन असलेले सिनेमे रोहित शेट्टी बनवत असतो. २३ डिसेंबरला त्याचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात फक्त ऍक्शन आणि कॉमेडीच नाही, तर मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसून येणार आहे.
अशात हिंदी चित्रपटात रोहित शेट्टी मराठी कलाकांना जास्तीत जास्त संधी का देतो? असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना त्याने यामागे एक खास कारण असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी शोमध्ये रोहित सर्कसच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी त्याने याचे उत्तर दिले आहे.
तो म्हणाला की, मी मराठी कलाकारांना चित्रपटात का घेतो? हा प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारण्यात आला आहे. पण यामागे एक खास कारण आहे. मराठी कलाकार हे खुप साधे असतात. पण त्यांचा अभिनय खुप जबरदस्त असतो. त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो.
तसेच काही अभिनेते त्यांच्या अभिनयामुळे जगभर प्रसिद्ध होतात. पण आपल्याला अभिनय येतो. त्यामुळे ते अहंकारी बनून जातात. त्यामुळे ते खुप नखरे सुद्धा करताना दिसतात. पण मराठी कलाकार खुप चांगले असतात. त्यांच्यात मला कधीही अहंकार दिसून येत नाही, असे रोहित शेट्टीने म्हटले आहे.
मराठी कलाकार खुप साधे असतात. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते कुठेही असले तरी त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. आमचा चित्रपट १०० कोटींचा व्यवसाय करतो. त्यातून ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो. त्यामुळे माझ्या चित्रपटात मराठी कलाकार असतात. पुढेही ते असणार, असेही रोहित शेट्टीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत
beed : घाबरलेले बैल थेट तलावात गेल्यामुळे मोठा अपघात, पाण्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू
ravi godse : भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार का? डॉ. रवी गोडसे म्हणाले ‘हो येणार, पण…