IPL 2022 मध्ये गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता. लखनौने पहिल्याच प्रयत्नात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध संघाचा पराभव झाला. कर्णधार केएल राहुलने उत्कृष्ट कामगिरी केली होती. जोस बटलरनंतर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तो होता.
माजी सलामीवीर गौतम गंभीरने T20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील टॉप-7 फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये गंभीरने केएल राहुलचा समावेश केलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यातील कॉमेंट्रीदरम्यान गंभीरने भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मासह इशान किशनची निवड केली आहे.
गंभीरने तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीची निवड केली आहे. यानंतर दीपक हुडा, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या त्याच्या संघात असतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. केएल राहुलने आयपीएलमध्ये खूप धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आयपीएल 2022 च्या एलिमिनेटरमध्ये लखनौला RCB विरुद्ध 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात राहुलने 79 धावा केल्या, पण त्यासाठी 58 चेंडू घेतले. त्याआधी इतर अनेक सामन्यांमध्येही संघाला राहुलच्या संथ फलंदाजीचा फटका सहन करावा लागला होता.
केएल राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याचवेळी गौतम गंभीरने त्याच्या जागी ईशान किशनची निवड केली आहे. IPL 2022 मध्ये इशानने सातत्यपूर्ण धावा केल्या नाहीत पण तो वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये 48 चेंडूत 76 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये 21 चेंडूत 34 धावा केल्या.
विकेटची पर्वा न करता तो फटकेबाजी करू शकतो पण केएल राहुलच्या बाबतीत तसे नाही. जेव्हा लखनौ आयपीएलमधून बाहेर झाली तेव्हा केएल राहुल आणि गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल जात होता ज्यामध्ये गंभीर खुपच संतप्त दिसत होता. त्यानंतर केएल राहुल सोशल मिडीयावर ट्रोल झाला होता.
एका मुलाखतीत गंभीर म्हणाला होता की, इशान किशन कोणत्याही भीतीशिवाय खेळतो आणि टी-20 विश्वचषकात हा दृष्टिकोन आवश्यक आहे. तो म्हणाला की केएल राहुलने मधल्या फळीत खेळावे आणि इशान किशनने रोहित शर्मासोबत सलामी करावी. स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान गौतम गंभीर बोलत होता.
गंभीर असेही म्हणाला होता की, केएल राहुलने टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करू नये आणि इशान किशनने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी. गंभीरच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर इशान किशन खूप प्रभावी ठरेल आणि तो संघात एक्स फॅक्टर आणतो.
महत्वाच्या बातम्या
लिहायचं होतं ‘देहू’ झालं ‘जुहू’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनादरम्यान पचका, वाचा काय घडलं?
दारु पिऊन आईला का छळता? बाईकवर बसवून बापाला रानात नेलं अन्…, वाचून हादरल
सागर कारंडे, भारत गणेशपुरेला ‘या’ हिंदी कॉमेडी शोमध्ये मिळाले काम, चला हवा येऊ द्या शो सोडणार?
‘पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष स्थापन केला तर…,’ इम्तियाज जलील यांच्या व्यक्तव्याने खळबळ