Share

खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून विजयी झाला. निवडणूक जिंकल्यानंतरही तो क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अधूनमधून दिसत असतो. कधी तो सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो तर कधी मेंटरच्या भूमिकेत.

आयपीएल 2022 चा नवीन संघ, लखनौ सुपर जायंट्सने गंभीरला आपला मार्गदर्शक बनवले होते. गौतम गंभीरवर खासदार असतानाही क्रिकेटशी निगडित असल्याबद्दल खूप टीका केली जाते. यावेळी तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. यासोबतच विरोधी पक्षही त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

आता 2011 वर्ल्ड कप फायनल आणि 2007 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी इनिंग खेळणाऱ्या गौतम गंभीरने याला सडेतोड उत्तर दिलं आहे. गौतम गंभीरने आयपीएलमध्ये काम करण्यावर आपली प्रतिक्रिया देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गौतम गंभीर म्हणाला की,  ‘मी आयपीएलमध्ये काम करतो कारण मी 5000 लोकांना खायला घालण्यासाठी दरवर्षी 2.75 कोटी रुपये खर्च करतो. हे सर्व पैसे मी माझ्या खिशातून खर्च करतो. मी आयपीएलमध्ये काम करतो हे सांगायला मला लाज वाटत नाही. हे मी करत असलेल्या सर्व गोष्टींचे अंतिम ध्येय आहे.

तसेच गंभीर पुढे म्हणाला की, वाचनालय बांधण्यासाठी मी 25 लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचे हे उत्तर ऐकून अनेक जणांनी त्याचे कौतुक केले तर जे लोक त्याला ट्रोल करत होते त्यांची बोलती बंद झाली. गौतम गंभीर त्याच्या रागीट स्वभावामुळे नेहमी ओळखला जातो. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने अप्रतिम कामगिरी केली.

या संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आणि प्लेऑफमध्येही पोहोचले. जिथे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हरला. संघाच्या कामगिरीचे श्रेय मोठ्या प्रमाणावर गौतम गंभीरला दिले जात आहे. गंभीरने कर्णधार म्हणून दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या
एकेकाळी घरोघरी जाऊन देवीची गाणी म्हणायची नेहा कक्कर, आज आहे कोट्यावधींची मालकीण
हिंदी चित्रपटसृष्टीचा गैरसमज आहे की मराठी कलाकार हा…, अशोक सराफांनी सांगीतले सत्य
अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्या बनला १०० कोटींचा मालक, शेअर मार्केटमधून कमावली कोट्यवधीची संपत्ती
नवा झुनझुनवाला झाला तयार! २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून कमावले १०० कोटी; १७ वर्षांचा असल्यापासून करतोय ट्रेडींग

ताज्या बातम्या खेळ राजकारण

Join WhatsApp

Join Now