महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. (gaurav more talk about the award)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले आहे. त्यातलाच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. लोकांना हसता यावं यासाठी अनेकदा तो स्वत;चा अपमानही सहन करतो. असा एकही दिवस गेला नसेल, जेव्हा स्किटमध्ये त्याचा अपमान झाला नसेल.
गौव मोरेचे स्किट आजही महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. अशात गौरवचा स्किटमध्ये अपमान होत असला तरी आता त्याचा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते त्याचा गौरव करण्यात आला आहे. गौरवला नुकत्याच एका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार स्विकारतानाचा एक फोटोही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
गौरवला धर्मात्मा फाऊंडेशनतर्फे भिमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर गौरवने एक पोस्ट शेअर केली आहे, जी खुप भावनिक आहे. गौरवच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मी हा पुरस्कार घेण्याच्या लायकीचा आहे की नाही माहित नाही, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
गौरवची इंस्टाग्राम पोस्ट-
खरच मी ह्या पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणाऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोठ्ठा मान आपण दिलात, खुप आभारी आहे
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब, मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशन चे खुप खुप आभार मानतो. सर्व प्रेकक्षकांचे आभार मानतो.
महत्वाच्या बातम्या-
‘जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या,’ शरद पवारांचे थेट मोदी सरकारला आवाहन
मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..
संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीनं संपलाय; संजय राऊतांनी खडसावून सांगितलं