Share

गॅस सिलेंडरवरचे अनुदान झाले कायमचे बंद, आता फक्त ‘या’ लोकांना मिळणार २०० रुपये सूट

महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एलपीजी सिलेंडरवर अनुदान मिळणाऱ्या लोकांना आता त्याचे अनुदान विसरावे लागणार आहे. उज्ज्वला योजना वगळता एलपीजी सिलेंडरवर कोणतीही सबसिडी मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. (gas cylinder subsidy stop)

तसेच आता इतर सर्व श्रेणीतील ग्राहकांना केवळ विनाअनुदानित दराने एलपीजी सिलेंडर खरेदी करावे लागतील. या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करताना, सचिव पंकज जैन यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जून २०२० पासून एलपीजी सिलेंडरवर कोणतेही अनुदान दिलेले नाही. या प्रकरणात केवळ सबसिडी दिली जात आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

पंकज जैन यांनी म्हटले की, कोविड महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून एलपीजी सिलेंडर खरेदी करणाऱ्यांना कोणतेही अनुदान दिले जात नाहीये. तेव्हापासून फक्त एकच अनुदान आहे आणि ते अनुदान फक्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे.

सचिवांच्या या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की, आता सिलेंडरवर अनुदान फक्त उज्ज्वला योजनेंतर्गत ९ कोटी गरीब महिला आणि इतर लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. याशिवाय इतर सर्व कुटुंबांना बाजारभावानेच सिलेंडर खरेदी करावे लागणार आहेत.

डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी तर डिझेलवर ६ रुपयांनी कपात करण्यात आली. यासोबतच त्यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ सिलेंडरवर २००-२०० रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, सरकार हळूहळू सर्वच गोष्टींवरील अनुदाने बंद करताना दिसून येत आहे. सर्वप्रथम मनमोहन सिंग सरकारने जून २०१० मध्ये पेट्रोलवरील सबसिडी रद्द केली. यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये मोदी सरकारने डिझेलवरील सबसिडी बंद केली. काही वर्षांनी रॉकेलवरील अनुदानही बंद झाले. आता एलपीजी सिलेंडरवरील सबसिडीही एक प्रकारे संपली आहे.

महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
‘सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात व्यस्त आहेत’, अजित पवारांचा भाजपला टोला
‘या’ चार बोल्ड वेबसिरीजने घातलाय धुमाकूळ, चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका, नाहीतर होईल फजिती

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now