शैल पर्वत प्रदेशातील सिद्धपीठ हातकालिका मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर गंगोलीहाटमध्ये आठ तळ असलेली गुहा सापडली आहे. गुहेतील खडकांमध्ये विविध पौराणिक प्रतिमा आढळल्या आहेत. तर तिथे असलेल्या शिवलिंगावर नैसर्गिक जलाभिषेक होताना दिसून येत आहे. (gangolihat mahakaleshwar cave)
ही गुहा चार स्थानिक तरुणांनी शोधून काढली असून त्याला महाकालेश्वर लेणी असे नाव देण्यात आले आहे. प्रसिद्ध पाताळ भुवनेश्वर गुंफेपेक्षाही ती मोठी असू शकते, असे मानले जाते. रविवारी गंगोलीहाटच्या गंगावली वंडर्स ग्रुपचे सुरेंद्र सिंग बिश्त, ऋषभ रावल, भूपेश पंत आणि पप्पू रावल यांनी गुहेत प्रवेश केला होता.
गुहेचा आकार पाहून सगळेचजण थक्क झाले होते. चौघे गुहेच्या दोनशे मीटर आत पोहोचले. सुरेंद्रच्या म्हणण्यानुसार, आत प्रवेश करताच ते प्रथम सुमारे ३५ फूट खोल पाण्यात उतरले. त्यानंतर सुमारे आठ फुटांच्या नैसर्गिकरीत्या बनवलेल्या पायऱ्या सापडल्या. पुढे गेल्यावर, सपाट भागातून आठ तळं पार केली. त्यात नववा तळ पण होता पण तिथे पोहोचता आले नाही. ही गुहा सुमारे २०० मीटर लांब आहे.
याठिकाणी असलेल्या शिवलिंगावर दगडातून पाणी टपकताना दिसून येते. याशिवाय शेषनाग आणि इतर पौराणिक देवी-देवतांची चित्रेही समोर आली आहेत. टीम लीडर सुरेंद्र सिंग यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कमी प्रकाशाच्या टॉर्च होत्या आणि दोरी वगैरे नसल्यामुळे ते नवव्या तळापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
आतापर्यंत सापडलेल्या गुहांपैकी ही सर्वात मोठी आहे, ज्या गुहेत पुरेसा ऑक्सिजन आहे. १५० मीटर खोल पाताळ भुवनेश्वरप्रमाणेच ही गुहा या प्रदेशाच्या पर्यटनात मैलाचा दगड ठरू शकते. गंगावली वंडर्स ग्रुपला आधुनिक उपकरणे मिळाल्यास परिसरातील इतर तीन लेण्यांचीही माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवतील.
गंगावली प्रदेशातील शैल पर्वत शिखरावरील मानसखंडामध्ये २१ लेण्यांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये दहा गुहा सापडल्या आहेत. सिद्धपीठ हाट कालिका मंदिराच्या आजूबाजूला रविवारी सापडलेल्या गुंफेशिवाय तिथे आणखी तीन गुहांचे संकेत मिळतात.
रविवारी गुहेचा शोध लागलेल्या तरुणांनी या गुहेला महाकालेश्वर असे नाव दिले आहे. स्थानिक जनता याला प्रमुख श्रद्धास्थान मानत आहे. सुरेंद्रच्या माहितीवरून कुमाऊं विद्यापीठाचे माजी भूवैज्ञानिक डॉ. व्हीएस कोटालिया हे सुद्धा गुहेची पाहणी करण्यासाठी आल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण…’. आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक
हा सत्कार लय भारी आणि मरेपर्यंत.., नागपूरच्या महिलांनी केलेला सत्कार पाहून नागराज मंजुळे भारावले
प्रसाद ओकने निळूभाऊंना दिली गुरूदक्षिणा; मोठी घोषणा करत म्हणाला, तुमचा आशिर्वाद की काय..