Share

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते ‘पवार सरकार”, शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

भाजपाला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. मात्र ठाकरे सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्या संपण्याच नाव घेत नाहीये. अनेक नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत. तर काही नेते हे सरकारमधील पक्षाला दोष देत आहेत.

अशातच पुन्हा एकदा शिवसेना खासदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. “आम्ही केवळ ठाकरे सरकार म्हणायचे. परंतु, प्रत्यक्षात लाभ कोण घेत आहे? त्यामुळे ठाकरे सरकार नाही तर पवार सरकार म्हणायचं” असा टोला लगावत शिवसेना खासदार गजानान किर्तीकर यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात अशी टिपण्णी किर्तीकर यांनी केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “मुंबईमध्ये आम्हाला हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार, अशी टीका त्यांनी केली.

तसेच या कार्यक्रमात खा. किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्य सरकारमध्ये अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो, हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र इकडे जास्त आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आहेत. परंतु, असं असलं तरी निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्यामुळे अनेकदा शिवसेना आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता किर्तीकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एमआयएमच्या प्रस्तावावर खुद्द शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, कोणी कोणत्या पक्षात जायचं हे..
तब्बल ८०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश, बँकेच्या माजी अध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रपतींच्या आदेशावरून एसआयटी उघडणार काश्मीरची मूळ फाइल; दोषींना शिक्षा होणार?
20 वर्षांपासून बागेत पडला होता पुतळा; आजची किंमत ऐकून जोडप्याला बसला धक्का

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now