एकनाथ शिंदेंनी आणि काही आमदार, खासदारांनी बंडखोरी केली अन् महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने आणि भाजपने एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन केले. पण त्यांच्यामध्येही वादविवाद होताना दिसत आहेत. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाध्यक्षपदाबरोबरच पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा त्यांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. आता सगळ्यांची नजर याकडे आहे की, ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतात की, पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर ते राजीनामा मागे घेतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
शिवसेना फुटल्यानंतर आणि शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर संजय राठोड यांनीही शिंदे गटाची साथ दिली होती. राठोड यांच्या बंडखोरीनंतर गजानन बेजंकीवार यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. ते संजय राठोड यांच्यासोबत होते. मागील २० ते २५ वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत.
संजय राठोड यांच्या विश्वासू लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे. महिन्याभरापुर्वीच बाळासाहेबांच्या शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीतही गजानन बेजंकीवार यांच्याकडे जिल्दाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. त्यांच्याकडे अर्णी आणि वर्णी या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
पांढरकवडा तालुक्यातील ग्रामीण भागात बेजंकीवार यांना सपोर्ट करणारे अनेक लोकं आहेत. त्यांनी असा अचानक राजीनामा दिल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. अवघ्या महिन्याभरातच बेजंकीवार यांनी राजीनामा का दिला? असं काय घडलं? याचा खुलासा अदयाप झालेला नाही.
शिंदे गटालाही फुटीची लागण झाल्याचे दिसत आहे. पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदावरून जिल्ह्यातील शिंदे गटात काहीतरी वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या कारणामुळे बेजंकीवार यांनी राजीनामा दिला असल्याचे सुत्रांकडून कळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिर्डीला जाण्यासाठी पत्नीने केला हट्ट, त्याने सुट्टीही घेतली, पण काळाने घातला घाला अन् अख्ख कुटुंबच संपल
BCCI चा रोहीत विराटला दणका! ट्वेंटी संघातून केली कायमची हकालपट्टी, ‘या’ नव्या खेळाडूंना संधी
पोरगा कुस्तीपटू व्हावा म्हणून बापाने ५ एकर विकली, पोराने महाराष्ट्र केसरीत सुवर्णपदक मिळवत केलं चीज
उर्फी जावेदसारख्याच एका मॉडेलचा चित्रा वाघ यांच्याकडून सत्कार, सोशल मिडीयावर फोटो व्हायरल