यारों, दोस्ती बडी ही हसीन है.. हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.. यामध्ये एका व्यक्तीने पहिल्यांदा सरपंच पदासाठी निवडणूक लढवली आणि नंतर विजयही मिळवला. तर त्याच्या मित्रांनी अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा केला.
सरपंच झाल्यावर त्यांनी मित्राला फॉर्च्युनर कार भेट दिली. पुणे जिल्ह्यातील या मित्रांचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. मित्राने सगळ्या दिग्गजांना हरवले पण फॉर्च्युनर देऊन त्याच्या मित्रांनीही हिम्मत दाखवली. दत्तात्रय हरगुडे असे या नवनिर्वाचित सरपंचाचे नाव आहे.
दत्तात्रय हे पुण्यातील केसनंद ग्रामपंचायतीतून एकाच फटक्यात सरपंचपदी निवडून आले आहेत. मित्र सरपंच झाल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी जितक्या वेगाने पसरली तितका मित्रांचा उत्साह वाढला. मग काय मित्रांनी लगेच ठरवलं की काय करायचं आणि मग त्याच्या दारात चकाचक फॉर्च्युनर गाडी उभी केली.
साधारणपणे मित्र सरपंच झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो. उत्सवही असाच होता की तो संस्मरणीय ठरावा. पार्टी करायची, डीजे लावायचा, बँड-बाजा, सजावट करायची. सगळीकडे असंच होतं. रात्रभर डान्स करायचा, धमाल मस्ती करायची. पण त्याच्या मित्रांनी विचार केला की हे तर सगळेच करतात.
आज काहीतरी वेगळं करूया. मग काय, मित्रांनी हातपाय हालवले आणि सरपंच झालेल्या त्यांच्या मित्राच्या दारात एक नवीन चमकणारी फॉर्च्युनर गाडी लावली. मित्रांकडून एवढी मोठी भेट मिळाल्याने सरपंच झालेले दत्तात्रय हरगुडे भावूक झाले.
मित्रांकडून ही भेट मिळाल्यानंतर दत्तात्रय हरगुडे म्हणाले, ‘सरपंचपदी निवड झाल्यानंतर माझ्या मित्रांनी मला दिलेल्या फॉर्च्युनर कार भेटीबद्दल मी माझ्या मित्रांचा मनापासून आभारी आहे. माझ्या गावाच्या विकासासाठी मी माझी १००% क्षमता वापरणार आहे. मित्रांचे हे प्रेम माझ्यावर असेच राहील अशी आशा करतो.
या भेटवस्तूवर मित्र आणि कुटुंबीयांनी अनेक भावनिक प्रतिक्रिया दिल्या. दत्तात्रय यांच्या मित्रांचे कुटुंबीय म्हणाले, ‘आबा (दत्तात्रय) कधीही स्वत:वर खर्च करत नाहीत. त्याने नेहमीच गावासाठी, समाजासाठी खर्च केला आहे. आजपर्यंत त्याने समाजाला भरभरून दिलं आहे. आता आपली वेळ आली आहे की आपणही त्यांना काहीतरी द्यावे. म्हणूनच आम्ही त्याला फॉर्च्युनर कार भेट देण्याचा विचार केला.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटात अंतर्गत बंडाळी; ‘या’ बड्या नेत्याने तडकाफडकी एकनाथ शिंदेंकडे दिला राजीनामा
पृथ्वी शॉचे गाऱ्हाणे साईबाबाने ऐकले, दिले श्रद्धा अन् सबुरीचे फळ! ३ वर्षांनी टिम इंडीयात निवड
प्राजक्ता माळीच्या गळ्यातील दागिना पाहून सोनू सुदने दिली ‘ही’ रिऍक्शन, वाचा पुर्ण किस्सा
Nagraj manjule : पुन्हा एकदा जमली आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांची हिट जोडी, घेऊन येत आहेत ‘हा’ नवा चित्रपट