Share

आता मुंबईत कोणीच राहणार नाही उपाशी; दररोज २५ हजार गरजू लोकांना मिळणार मोफत जेवण; वाचा सविस्तर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. असे असूनही या शहरात दररोज हजारो लोक उपाशीपोटी झोपतात. हे लक्षात घेऊन ‘अक्षय चैतन्य’ नावाची स्वयंसेवी संस्था भायखळा परिसरात सेंट्रलाइज्ड स्वयंपाकघर सुरू करत आहे. (free meal programme for 25 thousand people)

या स्वयंपाकघराच्या माध्यमातून दररोज २५ हजार गरजूंना मोफत जेवण दिले जाणार आहे. या शहरात येणारा कोणी उपाशी झोपू नये हा या स्वयंपाकघराचा उद्देश आहे. या स्वयंपाकघरातून दररोज २५ हजारांहून अधिक लोकांना मोफत जेवण दिले जाणार आहे. हा उपक्रम ४ मार्चपासून सुरू होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसभर उपाशी राहावे लागू नये यासाठी मुंबईतील ‘अक्षय चैतन्य’ ही संस्था उत्तम काम करत आहे. संस्थेच्या ऑफिसपासून जवळ असलेल्या परिसरात कोणीही उपाशी झोपू नये, या उद्देशाने येथे काम केले जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत, दररोज २५ हजार भुकेल्या लोकांना सातत्य राखून अन्न पुरवण्याचा मानस या संस्थेचा आहे. या संस्थेच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित राहणार आहेत.

‘अक्षय चैतन्य’ ही ‘हरे कृष्णा मुव्हमेंट चॅरिटेबल फाउंडेशन’ची उपकंपनी आहे. ‘अक्षय चैतन्य’ नावाची ही संस्था भूक निर्मूलनासाठी मुंबई महापालिका आणि डीएमआयआर यांसारख्या संस्थांसोबत स्वतःचा हा उपक्रम राबवणार आहे.

रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय, स्थलांतरित कामगार आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरिबांची भूक भागवणे एवढाच या संस्थेचा उद्देश मर्यादित नाही. ‘अक्षय चैतन्य’ची योजना शाळांमध्येही मुलांना जेवण देण्याची आहे. गरीब कुटुंबातील मुलांना शाळांमध्ये जेवण देण्याची व्यवस्था केली जात आहे. अक्षय चैतन्यचे सीईओ विकास परचंदा यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मार्च महिन्यात मारुती करणार मोठा धमाका! लाँच करणार दोन नवीन कार, 7 सीटसह मिळणार 32Kmpl चे उत्तम मायलेज
मुलींना शिकणे झाले सोपे, खासगी शाळांमध्ये भरावी लागेल निम्मी फी, सरकारने दिल्या ‘या’ सूचना
‘कर्णधार रोहित शर्माशी हात मिळवताना जरा जपून…’, या’ माजी भारतीय खेळाडूने दिला इशारा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now