देशात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे पुन्हा एकदा एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आले आहे. देशातील द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे, असे आवाहन १०८ माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केले आहे. (former diplomats wrote letter to narendra modi)
पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात तुमचे मौन खूप मोठा धोका निर्माण करू शकते, असे म्हटले आहे. तसेच या पत्रामध्ये देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना आम्हाला नाईलाजाने संताप व्यक्त करावा लागतोय, असेही माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
माजी अधिकाऱ्यांनी पत्रात लिहिले आहे की, यावर्षी आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आम्हाला आशा आहे की पंतप्रधान पक्षपाती वृत्तीतून उठतील आणि सर्वांना समान वागणूक देतील. या वातावरणात तुमचे मौन समाजात मोठा धोका निर्माण करू शकते.
तसेच पत्रात आरोप करताना म्हटले आहे की, देशाच्या प्रस्थापित नेत्यांनी बांधलेली घटनात्मक इमारत पाडली जात आहे. या प्रकरणी लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने आपले म्हणणे मांडत संताप व्यक्त करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक समुदायांवर, विशेषत: मुस्लिमांविरुद्धच्या हिंसाचारात वाढ झाली आहे. विशेषत: आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भाजपशासित राज्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. केंद्रशासित प्रदेश दिल्लीत पोलिसांच्या माध्यमातून मनमानी सुरू आहे, असेही या पत्रात म्हटलेले आहे.
माजी गृहसचिव जेके पिल्लई, दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रधान सचिव टीकेए नायर, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव सुरजा सिंग यांच्यासह १०८ हून अधिक लोकांनी पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेल्या या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सबका साथ, सबका विकास हे वचन मनापासून पूर्ण करण्याचे आवाहन केले. त्यांनी आशा व्यक्त केली की, पंतप्रधान मोदी भाजप सरकारकडून विविध राज्यांमध्ये चालवले जाणारे द्वेषाचे राजकारण संपुष्टात आणतील.
महत्वाच्या बातम्या-
‘पहिल्यांदा जीएसटीचे पैसे द्या, महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव कमी करा’; ठाकरेंचा मोदींवर पलटवार
कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्बने स्वत:ला उडवणाऱ्या ‘या’ महिलेचे शिक्षण ऐकल्यावर व्हाल अवाक
“मला आणि आपल्या मुलांना तुझा अभिमान वाटतो..” पाकिस्तानात बॉम्बस्फोट घडवलेल्या महिलेच्या पतीचे ट्विट