Share

सुरेश रैनाला चेन्नई सुपरकिंग्जने संघात का नाही घेतले? माजी खेळाडूने धोनीचे नाव घेत सांगितले धक्कादायक कारण

आयपीएल २०२२ च्या लिलावात सुरेश रैनाचे नाव पुकारले गेले आणि चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यासाठी बोली लावली नाही. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण लोकांना पहिल्यांदा वाटले की पहिला दिवस असल्यामुळे रैनाला संघात घेतले नाही. पण दुसऱ्या दिवशीही चेन्नईने रैनाला संघात घेण्यास नकार दिला. (former cricketer on suresh raina)

चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैनाला २५ खेळाडूंचा संघ पूर्ण करताना खरेदी केले नाही. यावर बोलताना संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, तो संघाच्या सेटअपमध्ये बसत नाही. असे असताना रैनाला विकत न घेतल्याने चेन्नई सुपर किंग्जलाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

आता न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक सायमन डूलेने रैनाला न खरेदी करण्याचे कारण सांगितले आहे. सायमन डूले म्हणाला, की खरे तर रैनाने धोनीचा विश्वास गमावला होता, त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले नाही.

सायमन डूले यांनी क्रिकबझशी संवाद साधताना सांगितले, रैनाला संघात न घेण्याची दोन-तीन कारणं आहे. रैनाने यूएईमध्ये धोनीचा विश्वास गमावला होता. काय झाले ते पाहण्यासाठी मला तिकडे जायचे नव्हते पण त्यांनी विश्वास गमावल्याची चर्चा आहे. त्याने एमएस धोनीची निष्ठा गमावली होती. एकदा ते केले की पुन्हा परत येणे कठीण आहे. तसेच, रैना तंदुरुस्त नव्हता आणि त्यालाही शॉर्ट बॉलची भीती वाटते.

सुरेश रैनाने आयपीएल २०२० मध्ये सिजनच्या मधूनच माघार घेतली होती आणि भारतात परतला होता. कोरोनामुळे यूएईमध्ये आयपीएल झाली होती. काही वादामुळे रैना त्या मोसमात खेळला नाही, असे मानले जाते. यानंतर रैनाने आयपीएल २०२१ मध्ये नक्कीच पुनरागमन केले पण त्याला महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले.

त्यानंतर रैनाच्या अनुपस्थितीत सीएसकेची कामगिरीही उत्कृष्ट झाली. याशिवाय सीएसकेला मोईन अलीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एक अप्रतिम खेळाडू मिळाला, ज्यामुळे रैनाचे महत्त्व आणखी कमी झाले. पण मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाचा चेन्नई सुपर किंग्जच्या यशात मोठा वाटा आहे.

रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले ज्यात त्याने ५५२८ धावा केल्या. रैनाच्या नावावर एक आयपीएल शतक आणि ३९ अर्धशतके आहेत. चेन्नई व्यतिरिक्त सुरेश रैनाने आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये गुजरात लायन्सचे नेतृत्वही केले आहे. एक खेळाडू म्हणून सुरेश रैनाने चेन्नईसोबतचे चारही विजेतेपद पटकावले. पण आता रैनासारखा महत्त्वाचा खेळाडू चेन्नईच्या बाहेर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या-
हिजाब वादाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडणाऱ्या स्वरा भास्करवर नेटकरी संतापले, म्हणाले..
मुलांना दुचाकीवर बसवायचे असेल तर करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन, नाहीतर बसेल मोठा दंड; वाचा नियम
दुर्दैवी! हळदी समारंभाला आलेल्या १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू, लग्नमंडपात पसरली शोककळा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now