भारत आणि इंग्लंड याच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जात होती. ५ कसोटी सामन्यांमधील ४ सामने झाले असून १ कसोटी सामना राहिला होता. कोविड-१९ मुळे ही ५ सामन्यांची कसोटी मालिका मध्येच थांबवण्यात आली होती.
कसोटी मालिकेमधील ४ सामन्यांचे निकाल लागले आहेत. भारताने या मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. भारताचे नेतृत्व यावेळी विराट कोहली करणार नसून तर रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. तर भारताचे मुख्य कोच राहुल द्रविड देखील यावेळी या मालिकेत प्रशिक्षण देणार आहेत.
निवडकर्त्यांनी जुलैमध्ये होणाऱ्या भारत आणि इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. भारतीय संंघातील दिग्गज गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपली आहे. निवडकर्त्यांनी या खेळाडूला जुलैमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली नाही.
भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज इशांत शर्माला भारतीय संघात पुन्हां स्थान मिळणं कठीण झाले आहे. इशांत शर्माने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. आयपीएलमध्ये देखील इशांत शर्माने शेवटचा सामना २०२१ मध्ये खेळला आहे.
इशांत शर्माला खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे टीम मधून वगळण्यात आले आहे. आयपीएल २०२२ मध्ये कोणत्याही संघाने इशांत शर्मावर विश्वास दाखवला नाही. टीम इंडिया पाठोपाठ आयपीएलमध्येही इशांत शर्माला संधी दिली जात नाही. यामुळे इशांत शर्मासाठी क्रिकेटचे दरवाजे बंद झाले आहेत.
इशांत शर्माने आयपीएलमध्ये ९३ सामने खेळले असून त्याला आत्तापर्यत ७२ विकेट मिळाल्या आहेत. आयपीएलमध्ये १२ धावामध्ये ५ विकेट ही इशांत शर्माची सर्वाेतम गोलंदाजी आहे. टीम इंडियासाठी आता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची वेगवान त्रिकूटी तयार झाली आहे, त्यामुळे इशांत शर्माला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
महत्वाच्या बातम्या:-
जंगलातच बिकीनीवर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम
कश्मीरमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर; १८०० पंडीत, ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कश्मीर सोडले
धनंजय महाडिक यांची माघार? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला






