शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आढावा चांदणी चौक भेट देत पूलाची पाहणी केली आहे, सोबतच वाहतुकीचा आढावाही घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, यावेळी गडकरी यांनी पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये वाढणार्या ट्रॅफिक जामच्या समस्येचा सामना करण्यासाठी एक आयडिया सांगितली.
गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी पुण्यातील चांदणी चौकातील ट्रॅफिकच्या समस्येवर एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गडकरी यांनी पुण्याच्या ट्रॅफिक समस्यांचा सामना करण्याचे उपाय सांगताना फ्लाईंग बसचा उल्लेख केला. यामुळे पुणेकरांची वाहतून कोंडीमधून सुटका होणार आहे.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”.
दरम्यान, यावेळी बोलताना गडकरी यांनी पुणे-बेंगळुरु ग्रीनफील्ड हायवेची माहिती दिली. पुणे-बेंगळुरू ग्रीनफील्ड हायवेमुळे मुंबईहून बेंगळुरुला जाणार्या गाड्या पुण्यात येण्याऐवजी बाहेरच्या मार्गानेच निघून जातील. यामुळे मुंबईहून बेंगळुरु साडेचार तासात आणि पुण्याहून बेंगळुरू साडेतीन तासात पोहचता येईल, असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना गडकरी यांनी सांगितलं आहे की, ‘आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. यासाठी आमच्याकडे आर्थिक भांडवल देखील उपलब्ध आहे. वरच्यावरून वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. ‘
महत्त्वाच्या बातम्या