ज्या बाईक आतापर्यंत रस्त्यावर धावत होत्या, त्या लवकरच तुम्हाला आकाशात उडताना दिसणार आहेत. कारण आकाशात उडणाऱ्या बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाइकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे.
या बाईकमध्ये ८ पॉवरफुल जेट इंजिन वापरण्यात आले असून, ३० मिनिटांत ९६ किमीचा प्रवास करण्याची क्षमता आहे. बाईकच्या मूळ डिझाइनमध्ये चार जेट इंजिने वापरली गेली होती, तर आठ जेट इंजिन त्याच्या अंतिम डिझाइनमध्ये दिसतील. म्हणजे चारही कोपऱ्यांवर दोन जेट इंजिन वापरले जाणार आहेत. जे रायडरला संरक्षण देण्यास सक्षम असेल. ही बाईक १३६ किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह २५० किलोपर्यंतचे वजन उचलण्यास सक्षम आहे.
हवेतून उडणारी ही मोटारसायकल २५०mph (४०० km/h) वेगाने हवेत उडण्यास सक्षम असेल. एखाद्या चांगल्या पायलटलाही ही गाडी इतक्या वेगाने चालवणे कठीण जाऊ शकते. पण ही बाईक चालवताना तुम्हाला ट्रॅफीकचा सामना करावा लागणार नाही.
या बाईकद्वारे तुम्ही केवळ ३० मिनीटांत मुंबई ते लोणावळा अंतर सहज पार करू शकता. वाहतूक कोंडीमुळे सध्या मुंबई ते लोणावळा हे अंतर पार करण्यासाठी किमान २ तास लागतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक चांगला पायलट हवेत उडणारी ही बाईक 16,000 फूट उंचीवर नेऊ शकतो, परंतु या उंचीवर गेल्यावर तिचे इंधन संपले तरीही पायलट रायडरला जमिनीवर सुरक्षितपणे परतण्यासाठी पॅराशूटची व्यवस्था केली गेली आहे.
या बाईकमध्ये लढाऊ विमानांमध्ये वापरले जाणारे फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे आणि दुसरे बटण उंचीवर जाण्याचे आणि वेगाने पुढे जाण्याचे आहे.
सुरक्षितता लक्षात घेऊन त्याच्या कंट्रोलिंग युनिटमध्ये सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. जे उड्डाण करताना उड्डाणाच्या दिशेची माहिती ठेवण्याबरोबरच, झाड किंवा इमारतीसारखी एखादी वस्तू समोर आल्यावर आपोआप टक्कर होण्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे.
बाईकची निर्माता कंपनी जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत ३.१५ कोटी रुपये ठेवली आहे. ही बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते. कंपनीने आताच या बाईकचे बुकींग सुरू केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Abhimanyu ishwaran : मुलासाठी बापाने उभारलं क्रिकेटचं स्टेडियम, मुलाने तिथेच शतक झळकावत बापाचं स्वप्न साकार केलं
घरातील लहानमोठ्या सर्वांना आहो पण आईला मात्र एकेरी हाक का मारतो रितेश; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
एकेकाळी फक्त १८ रुपयांना मिळायची सायकल; आजोबांच्या काळातील बिल बघून धक्का बसेल
७० हजारांची गुंतवणूक करून कमावले तब्बल १५ लाख; पठ्ठ्याने सांगीतली शेती करण्याची भन्नाट ट्रिक