Share

मच्छीमाराला सापडला सर्वात मौल्यवान नारंगी मोती, एका रात्रीत झाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक

एका क्षणात स्वप्न पुर्ण होत नसतात. त्यासाठी कष्ट करावे लागते. पण कधी-कधी नशीब असं साथ देत की त्या एकाच क्षणात जे घडत त्यावर विश्वासच बसत नाही. असच काहीस मासेमारी करणाऱ्यासोबत घडले आहे. कारण या मच्छीमाराला नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती सापडाला यामुळे तो तब्बल २.५ कोटी रुपयांचा मालक झाला आहे. (fisherman find rare orange pearl and becomes crorepati)

भल्या मोठ्या समुद्राच्या पोटात अनेक मौल्यवान वस्तू आहेत हे आपण ऐकले आहे. त्या किमती गोष्टींच्या शोधात असंख्य लोक आहेत. त्यासाठी ते खूप पैसे खर्च करतात. तरीही या गोष्टी त्यांना मिळत नाहीत.

पण नशीबाने समुद्राकिनारी राहून पोट भरणाऱ्या मच्छिमारांना दुर्मिळ आणि मौल्यावन गोष्टी सापडल्याच्या घटना आपण वाचतो. खूपदा त्यांना दुर्मिळ मासे मिळतात यांची किंमत लाखांत असते.

नारंगी रंगाचा मोती सापडण्याची घटना थायलंडची आहे. तेथील मासेमारी करणाऱ्या हाचाई नावाच्या व्यक्तीला हा दुर्मिळ मोती सापडला आहे. थायलंडच्या किनाऱ्याजवळ अनेक शिंपले होते त्यापैकी तीन स्नेल शेल होते.

हचाई आणि त्यांचा भाऊ दोघे हे शिंपले घेऊन घरी आले. त्यांनी ते शिंपले आपल्या वडिलांना दाखवले शिंपल्यांना स्वच्छ केल्यानंतर त्यांना मोती दिसला. हा दुर्मिळ नारंगी मोती सी स्नेल Melo Melo पासून बनतो तसेच तो शेलमध्येच राहतो.

धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नात एका वयोवृद्ध व्यक्तीने समुद्रकिनाऱ्यावर बोलावलं होतं आणि एक भेट घेऊन जा असं सांगितलं होतं. असे ३७ वर्षीय मोती सापडलेल्या हाचाई या मच्छिमाराने सांगितले आहे.

माझं भाग्य मला या मोत्यापर्यंत घेऊन आलं. आता हा मोती जास्तीत जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न आहे. हाचाईने या मोत्याला १० मिलियन थाई म्हणजे २.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठा दिलासा! नवाब मलिकांच्या ‘या’ तीन मागण्या मान्य करत न्यायालयाने वाढवली ईडीची डोकेदुखी
…म्हणून मी RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; विराट कोहलीने केला हैराण करणारा खुलासा
आता मुलीच्या लग्नाची काळजी सोडा, दररोज फक्त १५१ रुपये जमा करा आणि मिळवा ३१ लाख रुपये
आता मुलीच्या लग्नाची काळजी सोडा, दररोज फक्त १५१ रुपये जमा करा आणि मिळवा ३१ लाख रुपये

इतर

Join WhatsApp

Join Now