Share

असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव; वाचा नेमकं काय घडलं..

सध्या देशभरात उत्तर प्रदेशच्या निवडणूकांची चर्चा सुरु आहे. सर्व नेते आपआपल्या पक्षाचा जोमाने प्रचार करत आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी सक्रीय आहेत. असे असतानाच त्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. (firing on asaduddin owaisi car)

हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी स्वत: ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. टोल टॅक्सजवळ ही घटना घडली. या घटनेच्या तक्रारीनंतर पोलीस टोल टॅक्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

ओवेसी पिलखुवा छिजारसी येथून निवडणूक रॅलीला संबोधित करून परतत होते. टोल टॅक्सजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला. ओवेसी ज्या गाडीत बसले होते त्याचे टायरही पंक्चर झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा ताफा पिलखुआ येथे पोहोचला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यानंतर चालकाने गाडीवर गोळीबार झाल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा तीन-चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. आम्ही गाडी वेगाने पळवली, त्यादरम्यान आमच्या वाहनाच्या चालकाने हल्लेखोराला धडक दिली. हल्लेखोरांपैकी एकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते.

या हल्ल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले आहे. ही माहिती लोकसभा अध्यक्षांनाही देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केल्याचा दावाही त्यांनी केला. घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

ओवेसी यांनी ट्विट केले की, काही वेळापूर्वी चिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी ४ राऊंड फायर केले. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.

महत्वाच्या बातम्या-
भारतीय घराणे जे इतके श्रीमंत होते की इंग्रज आणि बादशाह त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज, अफाट होती संपत्ती
घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी
‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदमला ३० मुलांनी दिलाय लग्नासाठी नकार, कारण वाचून अवाक व्हाल

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now