Eknath shinde | ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ९ ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा पार पडली. या यात्रेत काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामध्ये ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांचा समावेश होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, राजन विचारे, सचिन चव्हाण आणि अनिता बिरजे आणि आयोजक मधुकर देशमुख या नेत्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटात वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आधीच शिंदे आणि ठाकरे गटात वेगवेगळ्या मुंद्द्यांवरून वाद सुरू आहे. मग तो चिन्हाचा असो किंवा नावाचा. ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार एकमेकांविरोधात गरळ ओकताना पुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर सडकून टीका केली होती.
या दसरा मेळाव्यानंतर ठाकरे गटाकडून गडकरी रंगायतन येथे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या थाटामाटात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राजन विचारे, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सचिन चव्हाण आणि अनिता बिरजे आणि आयोजक मधुकर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती.
त्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला असून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Deepak Lande : सत्तारानंतर शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार नाराज; म्हणाला, आम्ही काय फक्त नाश्ता करायचा का?
Mashaal : नवं चिन्ह मिळताच मराठवाड्यात पेटली मशाल; शिवसेना उद्धव ठाकरे गटाची विजयी सलामी
Terrorists: दोन गोळ्या लागूनही इंडियन आर्मीच्या ‘या’ कुत्र्याने केला दहशतवाद्यांचा खात्मा, वाचा कोण आहे ZOOM?
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL होणार बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय