Share

मोठी बातमी! अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अजामीनपात्र गुन्हा असल्याने तुरूंगात जावे लागणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात सध्या वातावरण तापलेले आहे. औरंगाबादेत घेतलेल्या सभेनंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सडकून टीका केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिस महासंचालकांची पत्रकार परिषद आज पार पडली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की राज ठाकरेंवर कारवाई होणार का? तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की, राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार. औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी भाषण तपासले आहे आणि लवकरच राज ठाकरेंवर कारवाई होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले होते.

त्यानंतर आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादेच्या सीटी चौक पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सभेच्या आयोजकांनाही पोलिसांनी दणका देत गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबादेत राज ठाकरेंनी १ मे रोजी सभा घेतली होती.

या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्ती दिल्या होत्या ज्याचे पालन राज ठाकरेंना करायचे होते. पण यातल्या काही अटींचा भंग तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात?

राज ठाकरेंना अटक होणार का? औरंगाबाद पोलीस पुढं काय पाऊले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या बड्या नेत्यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद सांगितले की, जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

पुढे ते म्हणाले की, कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडवू नये नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच समाजकंटकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. राज्यातील जनतेला त्यांनी शांततेतंच आवाहन केलं आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या बातम्या
मनसेच्या १५,००० कार्यकर्त्यांना नोटीस; मुंबई सोडण्याचे आदेश, तेढ निर्माण करणारांवर कठोर कारवाईचा इशारा
“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याहून २८ वर्षांनी लहान मुलीसोबत जमवले लग्न; नाव वाचून धक्का बसेल
‘सलाम नमस्ते’मध्ये दिसला होता अर्शद वारसीचा मुलगा, 17 वर्षांनंतर दिसतोय ‘असा’, पहा फोटो

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now