राज्यात सध्या मशिदींच्या भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. बुधवारी ४ तारखेला जिथे जिथे भोंग्यांवर अजान सुरु होईल, तिथे तिथे लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा असे आवाहन राज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. (fir file against sandeep deshpande)
राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करुन ते केले आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्याचे वातावरण तापलेले आहे. बुधवारी अनेक ठिकाणी पहाटे भोंग्यांविना अजान झाल्या. तर जिथे भोंगे लावून अजान झाल्या तिथे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली होती.
बुधवारी अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेत होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यानंतर संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत असलेले संतोष धुरी तिथून पळून गेले होते. आता याप्रकरणी संदीप देशपांडेंसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच महिला कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि संदीप देशपांडेंचा वाहनचालक या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कासार यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर साक्षीदार म्हणून जखमी कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे), २७९ (निष्काळजीपणाने गाडी चालवणे), ३३६ (दुसऱ्या व्यक्तीस दुखापत होईल असे कृत्य करणे) असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही मुंबई पोलिसांना संदीप देशपांडेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब बनण्याचा प्रयत्न सुरु आहे’, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
Apple कंपनीला ‘हा’ छोटासा निर्णय पडला महागात; जॉब सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची लागली रांग
सकाळी निसटलेले रात्री प्रकट झाले! संदीप देशपांडेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टच सांगितलं, म्हणाले..