Share

सोमय्यांची जेलवारी पक्की? INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस कारवाई करणार

kirit

भाजप नेते किरीट सोमय्या हे सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येतात. पण आता ते स्वत: एका अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir file against kirit somaiyya)

किरीय सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह अप्पर पोलिस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कमल ४२०, ४०६, ३४, अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत फाइल्स उघड केली आहे. याप्रकरणी संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते, पण त्यांनी तो जमा केलेला नाही, असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला होता.

याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कुठलाच निधी न आल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मागील महिन्यात समोर आली, असेही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

आयएनएस भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन केले होते. विक्रांतला वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमा केला होता. मुंबईमध्ये सोमय्यांनी अनेक लोकांकडून निधी जमवला होता. यातून ५७ ते ५८ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराचे प्रमुख किरीट सोमय्या होते, असे संजय राऊतांनी म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी आता किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
वसंत मोरे यांची ‘ती’ भूमिका योग्यच आहे, बहिण म्हणून मी त्यांच्या पाठिशी आहे- रुपाली पाटील
गायक शंकर महादेवन गाणार ब्रेथलेस हनुमान चालीसा, मोठी घोषणा करत लोकांना केले ‘हे’ आवाहन
टिकली लावल्यामुळे महिलेसोबत घडला भयानक प्रकार; पोलिस कर्मचाऱ्याने दिली जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now