मुंबई पोलिसांनी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यावर लैंगिक छळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण याप्रकरणी गणेश आचार्यकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गणेश आचार्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (fir file against ganesh acharya)
गणेश आचार्य तेच आहेत ज्याने पुष्पाचा आयटम साँग ‘ओ अंतवा’ कोरिओग्राफ केला आहे, ज्यावर त्याने अल्लू अर्जुन आणि समंथा रुथ प्रभूला त्याच्या इशाऱ्यावर डान्स करायला लावला होता. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर यांसारख्या बॉलीवूडमधील सर्व बड्या स्टार्सना त्यांनी डान्स मूव्ह्स शिकवल्या आहेत.
गणेश आचार्याची कोरिओग्राफी ओ अंतवा गाण्यामुळे खूप प्रसिद्ध झाली, ज्यावर लाखो रील बनल्या आहेत. मात्र आता त्यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांचे नाव वादात सापडले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी त्यांचीच चर्चा सुरु आहे.
महिला कोरिओग्राफरने २०२० मध्ये ही तक्रारी नोंदवली होती. त्यात लिहिले होते की, जेव्हा ती गणेशच्या ऑफिसमध्ये कामावर जायची तेव्हा तो तिच्यावर चुकीच्या कमेंट करत असे. त्याचवेळी त्याने तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यासही सांगितले आणि महिलेने तसे करण्यास नकार दिल्यावर कोरिओग्राफरने तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
आरोप करणाऱ्या महिलेचे म्हणणे आहे की, गणेश आचार्यने तिला सांगितले होते की, जर तिला यशस्वी व्हायचे असेल तर त्याच्यासोबत सेक्स करावा लागेल. महिलेच्या नकारानंतर सहा महिन्यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनने तिचे सदस्यत्वही रद्द झाले होते.
महिलेचे असेही म्हणणे आहे की, जेव्हा तिने एका बैठकीत गणेश आचार्यला विरोध केला तेव्हा तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतरच तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, त्यानंतर तिने वकिलाची मदत घेऊन एफआयआर दाखल केली.
महत्वाच्या बातम्या-
विकी-कतरिना सीक्रेट लोकेशनवर करत आहेत एन्जॉय, रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, चाहते म्हणाले..
‘या’ चित्रपटात आमिरसोबत झळकणार जेनेलिया देशमुख, अनेक वर्षांनंतर चालणार क्युटनेसचा जादू
मुलीच्या जीवापेक्षा अब्रू ठरली महत्त्वाची; बलात्कार झाला म्हणून बापाने लेकीचा घोटला गळा, थरकाप उडवणारी घटना