काँग्रेस(Congress): काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढत आहेत. दरम्यान, गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे आठ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे तब्बल दोन तृतीयांश आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गोव्यात काँग्रेसचे खास नेते दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह आठ आमदार आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली आहे. काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही गोव्याच्या राजकारणाशी संबंधित मोठी बातमी आहे. गोव्यात काँग्रेस पक्षात फूट पडली असे या प्रकरणातून समोर येत आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आपलेच लोक दुरावत आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकेल लोबो यांचा समावेश आहे. सोबतच डेलीलाह लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ४० सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेसकडे ११ आणि भाजपकडे २० सदस्य होते.
आता काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आता गोव्यात काँग्रेसचे फक्त ३ आमदार उरले आहेत. तसेच जुलै २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, आता देशात काँग्रेस छोडो यात्रा सुरू झाली आहे.
या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसने दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर पक्षविरोधी कटात सहभागी असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी फुटी टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या ५ आमदारांना चेन्नईला हलवले होते. यापूर्वी २०१९ मध्ये काँग्रेसचे १५ पैकी १० आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांना भाजपमध्ये सामील करून घेतले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात १५० दिवसांचा ३७५० किलोमीटरचा प्रवास केला जात आहे. हा प्रवास देशातील १२ राज्यांमधून केला जाणार आहे. भारत जोडो यात्रेचा आज ८ वा दिवस आहे. गोवा काँग्रेसमधील तब्बल ११ पैकी ८ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश ही काँग्रेससाठी धक्कादायक बातमी आहे.
महत्वाच्या बातम्या
Audio clip : पोलीस इन्सपेक्टरने मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह गरळ ओकली; आॅडीओ क्लिप व्हायरल, मराठे आक्रमक
Bhajpa: भाजप महाराष्ट्रातील आणखी एक मित्रपक्ष संपवणार? सहकारी पक्षाचा एकमेव आमदार फोडण्याच्या हालचाली
BJP : भाजपचा शिंदेंना दे धक्का! शिवसेनेचा आमदार असलेल्या अंधेरी विधानसभेसाठी भाजपने उमेदवार केला जाहीर
Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार






