राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता गुणरत्न सदावर्तेंविरोधात आता भाजपने दंड थोपटले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या तालुका अध्यक्षांनी सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला गेला. सदावर्ते यांच्याविरोधात बीडमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? का बीडमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला?
काही दिवसांपूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी तक्रार दाखल केली होती. “सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित केलं. त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी त्यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या”, अशी तक्रार देण्यात आली होती.
मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर रविवारी येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सदावर्तेंच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला भाजप तालुकाध्यक्षांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
बीडचे भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते हा समाज विघातक माणूस असून त्याच्या तोंडाळा काळं फासणाऱ्यालाहा पन्नास हजारांचं बक्षीस देण्यात येईल, असे स्वप्नील गलधर यांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्ते हा दोन समाजात आणि जातींमध्ये तेढ निर्माण करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा. याबाबतची तक्रार बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे दिली आहे. या तक्रारीवर कारवाई न केल्यास जो कोणी सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासेल, त्याला ५० हजार रुपये देण्यात येईल, असे स्वप्नील गलधर यांनी म्हटले आहे.
तसेच याप्रकरणी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाचे नाव सच्चिदानंद पुरी असे आहे. सच्चिदानंद हा गुणरत्न सदावर्ते यांच्या जवळचा व्यक्ती आहे. तोच एसटी कर्मचाऱ्यांना गुणरत्न सदावर्तेंचा निरोप पोहचवायचा. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटात पुरी हा सामील असल्याचे तपासात समोर आले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल होताना दिसून येत आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनाला चिथावणी दिल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. तसेच मुंबईनंतर, अकोला, सातारा आणि कोल्हापूर येथेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा पोलिस तर सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘…म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला हवा होता; गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले
‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ
मी निर्लज्जासारखी वाट पाहत उभी राहायचे आणि.., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा किस्सा
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ‘ही’ अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत ‘या’ चित्रपटात केलं होतं काम