Share

Netaji: वडील स्वतंत्र भारत पाहू शकले नाहीत पण कमीत कमी.., नेताजींच्या मुलीची सरकारकडे मागणी

anita bose

नेताजी(Netaji): स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झालीत. नेताजींच्या आयुष्यात स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचं काहीच नव्हतं. म्हणून यावेळी त्यांची कमतरता वाटणारच. जर्मनीत राहणाऱ्या नेताजींची मुलगी अनिता बोस फाफ यांनी भारत सरकारकडे नेताजींचे अवशेष भारतात आणण्याची मागणी केली.

तत्कालीन ब्रिटीश राजवटीशी लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठे रहस्य आहे. नेताजींची एकुलते एक अपत्य अनिता बोस फाफ फार पूर्वीपासून नेताजींचे अवशेष रेनकोजी मंदिरात असल्याचे सांगत आहेत. नेताजींच्या अनेक भारतीय नातेवाईकांनी तैवानमधून नेताजी कुठे गेले हे शोधण्यासाठी सरकारला अनेकवेळा विनंती केली.

ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या अर्थशास्त्रज्ञ अनिता बोस फाफ नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी एमिली शेंकेल यांची मुलगी आहे. ब्रिटीशांशी लढण्यासाठी नेताजी जर्मनीतून दक्षिण पूर्व आशियामध्ये गेले तेव्हा त्या अवघ्या चार महिन्यांच्या होत्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर त्यांचे अवशेष एका जपानी अधिकाऱ्याने गोळा केले आहे. टोकियोच्या रेनकोजी मंदिरात जतन केले. तेव्हापासून पुजाऱ्यांच्या तीन पिढ्यांनी या अवशेषांची काळजी घेतली आहे, असे सांगण्यात येते.

जर्मनीत राहणाऱ्या ७९ वर्षीय अनिता बोस यांनी पुन्हा एकदा सांगितले की, जपानमधील टोकियो येथील एका मंदिरात नेताजींच्या अवशेषांच्या डीएनए चाचणीसाठी ती तयार आहे. मंदिरातील पुजारी आणि जपान सरकारलाही या चाचणीला हरकत नसून ते अवशेष सोपवण्यास तयार असल्याचेही अनिता बोस यांनी सांगितले.

‘किमान त्यांचे अवशेष तरी भारत भूमीत परत येऊ शकतात’
अनिता बोस यांनी आपल्या वक्तव्यात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या जनतेला आवाहन केले की, नेताजींच्या आयुष्यात त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते. त्यामुळे आता वेळ आली आहे की किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत येऊ शकतील. नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या
politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
Veer Savarkar: सावरकरांचा फ्लेक्स हटवून टिपू सुलतानचा लावण्याचा प्रयत्न, विरोध करताच घडला भयानक प्रकार
मला संपवायला निघालेल्यांचा सहा महिन्यात…, किरण मानेंची पुन्हा वादग्रस्त पोस्ट
Drugs: गुजरातमध्ये चाललंय काय? पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्स जप्त, मुंबई टीमची कारवाई

 

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय इतर

Join WhatsApp

Join Now