Share

गाडीचं छत उडालं अन् चिमुलली लेकरं थेट बाहेर फेकली, समृद्धी हायवेवर अंगावर काटा आणणारा अपघात

समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचा ( accident) वेगही सुसाट झाला आहे. याच समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार उलटून सहा जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता लोणार तालुक्यातील शिवणी पिसाजवळ दरम्यान घडली आहे. चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हयसाबाई भारत बर्वे (वय ६५), श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८), किरण राजेंद्र बर्वे (वय २८), प्रमिला राजेंद्र बर्वे (वय ५२), भाग्यश्री किरण बर्वे (वय २४), जान्हवी सुरेश बर्वे (वय ११) यांचा समावेश आहे. हे सर्व जण मरण पावले. छत्रपती संभाजीनगर येथील बरुडे व बर्वे कुटुंबीय रविवारी सकाळी इर्टिगा कारमधून शेगावकडे जात असताना लोणार हा अपघात झाला आहे.

दरम्यानच्या पुलाजवळील धडकेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार आत जाऊन पलटी झाली. रस्त्याच्या मध्यभागी तीन ते चार वेळा पलटी झाली. त्यावेळी कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

तसेच सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये कार चालक सुरेश भरत बर्वे (वय३२), नम्रता रवींद्र बर्वे (वय ३२), इंद्रा रवींद्र बर्वे (वय १२), सैम्या रवींद्र बर्वे (वय ४), जतीन सुरेश बर्वे (वय ४), वैष्णवी सुनील गायकवाड (वय ४) यांचा समावेश आहे.

यश रवींद्र बर्वे (वय १०) यांच्यासह जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील दोन कुटुंब शेगाव इथं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चालले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

दरम्यान, या भीषण अपघातात कारचे वरचे छप्पर उडून गेले आहे. तर प्रवासी अक्षरशः रस्त्यावर विखुरले गेले होते. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे अपघातानंतरची ही दृश्य मनाला चटका लावून जाणारी आहेत. अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते माधुरी दीक्षितचे अफेअर; ब्रेकअपचं कारण ऐकून धक्का बसेल
रोहित शर्माने भर मैदानात इशान किशनवर उचलला हात; कारण ऐकून व्हाल हैराण, पहा व्हिडिओ
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now