Share

ज्याने आजवर गाडीतून पेशंटला नेत शेकडो गावकऱ्यांचे प्राण वाचवले त्याचाच अपघातात मृत्यू

महाराष्ट्रातील मुंबई-गोवा (Mumbai-Goa) महामार्गवर एक भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. कार(car) आणि ट्रकच्या धडकेने कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघात इतका भीषण होता की, ट्रकमध्ये बसलेल्या लोकांनाही जीव गमवावा लागला. या अपघातात हेदवी गावातील एका वाहणं चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.  निलेश शशिकांत जाधव असे मृत्यू झालेल्या वाहनं चालकाने नाव आहे.

निलेश हा मुंबईमध्ये ड्रायव्हरची नोकरी करत होता. भाडे घेऊन गावी परत येत असताना निलेशच्या गाडीचा अपघात झाला. निलेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.‌ तसेच तो एकूलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निलेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण हेदवी गावात झाले. निलेशचे वडील शशिकांत जाधव हे गवंडी काम करतात. निलेशच्या पश्चात आई-वडील व छोटी बहीण असा परिवार आहे. अपघाताच्या वेळी कार रत्नागिरीतील गुहागर भागात वेगाने चालली होती. तर, ट्रक मुंबईकडे येत होता.

तेथून परतत असताना हेदवी गावचे रहिवासी जाधव, डावखोत येथील पंडित कुटुंबीय व अन्य काही लोक त्यांच्या गाडीत होते. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यु झाला. अपघात होताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, १९ जानेवारीला आजीचे वर्षश्राद्ध असल्यामुळे जाधव कुटुंब हेदवीला येत होते. पण यावेळी मुलगी,जावई, नातवंड अशी एकूण जवळची दहा माणसांचा मृत्यू झाला.

तर या अपघातात डावखोतमधील पंडित कुटुंब संपूर्णपणे संपले. निलेश पंडित , पत्नी नंदिनी पंडित आणि त्यांची मुलगी मुद्रा पंडित यांचा मृत्यू झाला आहे. तर पंडित कुटुंबातील बाकी ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now