Share

नाद खुळा! ६ लाख खर्चून शेतकऱ्याने घरावर बसवला खराखुरा ट्रॅक्टर; ‘हे’ आहे कारण…

राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये एका शेतकऱ्याच्या एनआरआय मुलाने घराच्या छतावर ३३ वर्षांचा जूना ट्रॅक्टर लावला आहे. अनुपगड तहसीलच्या रामसिंगपूर भागात राहणाऱ्या अंग्रेज सिंह यांनी ६ लाख रुपये खर्चून ट्रॅक्टरची डेंटिंग-पेंटिंग करून घेतली आहे. त्यानंतर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हा ट्रॅक्टर छतावर ठेवण्यात आला. (farmer tractor on house)

अंग्रेजने ट्रॅक्टरमध्ये लाईट आणि म्युझिक सिस्टीमही लावली आहे. अमेरिकेतून परतलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा हा ट्रॅक्टर लोकांना जवळ जाऊन पाहण्याची गरज नाही. त्या ट्रॅक्टरला तुम्ही लांबूनही बघू शकतात. शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी हे कृत्य केल्याचे अंग्रेज सिंह यांनी केले आहे.

रामसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे ट्रॅक्टर त्याच्या घरावर लावण्यात आले आहे. एका एनआरआय शेतकऱ्याने त्याच्या नवीन बांधलेल्या घरात स्थलांतरित होण्यापूर्वी क्रेनच्या मदतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवले आहे. त्यामुळे या ट्रॅक्टरची गावभरातच नाही, तर देशभरात चर्चा होत आहे.

अंग्रेज सिंह मल्ली यांनी सुमारे ६ लाख रुपये किमतीचा ३३ वर्षे जूना ट्रॅक्टर विकत घेतला आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आधुनिक क्रेनच्या साहाय्याने नवीन बांधलेल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवला. एवढेच नाही तर तिसऱ्या मजल्यावर ठेवलेला ट्रॅक्टरही खराब होऊ नये, यासाठी रिमोटच्या साहाय्याने तो दररोज सुरु करण्यात येणार आहे.

१९९२ पासून अमेरिकेत राहणारे अंग्रेज सिंह मल्ली म्हणतात, की ट्रॅक्टर हा शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा ट्रॅक्टर पूजनीय आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी आपल्या शेतात पिके घेतात आणि हे पीक शेतकऱ्याचे नशीब बदलते.

तसेच नव्याने बांधलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर ट्रॅक्टर ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला लहानपणापासून बुलेट मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची खूप आवड असून घराच्या छतावर ट्रॅक्टर ठेवावा असे माझे स्वप्न होते आणि आज ते स्वप्न मी पूर्ण केले, असेही मल्ली यांनी म्हटले आहे.

ट्रॅक्टर हे शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतिक असून प्रत्येक व्यक्तीने मग तो शेतकरी असो वा अन्य कोणताही व्यावसायिक, त्याने आपले काम पूर्ण झोकून देऊन केले पाहिजे, जेणेकरून त्याचे स्वप्न पूर्ण होईल, असेही अंग्रेस सिंह मल्ली यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर; म्हणाला, वडील गमावल्यानंतर माझी..
उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत कारण.., डिस्चार्ज मिळताच सोमय्या बरसले
लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’, वडिलांनी ‘या’ कारणामुळे बदलले होते नाव, रंजक आहे किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now