Share

SUV घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची सेल्समनने उडवली खिल्ली, अर्ध्या तासात जमा केले १० लाख

Don’t judge book by its cover अशी एक इंग्रजीमधून म्हण आहे. काही जण माणसाची किंमतही त्याच्या कपड्यावरून करतात. कपड्यावरून माणसाची पारख करू नये असा सल्लाही दिला जातो. पण कर्नाटकमधील एका सेल्समननं ही चूक केली आणि हीच चुक त्याला नंतर महागात पडली. (farmer goes to showroom to buy SUV )

तुमकूरमधील रहिवासी असलेला शेतकरी त्याच्या मित्रासोबत एका कारच्या शोरूममध्ये गेला होता. कार खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे कपडे पाहून तिथल्या सेल्समनने त्याला हटकलं आणि त्याचा अपमान केला. त्याने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. या शेतकऱ्याचे नाव होते रामनपाल्या के केम्पेगौडा.

हा शेतकरी मुळचा चिक्कासांद्रा होबलीमधील रहिवासी आहे. केम्पगौडा नवीकोरी एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरुममध्ये गेले होते. मात्र सेल्समनने त्यांची खिल्ली उडवली आणि त्यांचा अपमान केला. दोन लाख डाऊनपेमेंट आणि त्याच दिवशी डिलीव्हरी करण्याचे बोलणे सुरू होते. सेल्स टीमने त्यांना असे करण्यास नकार दिला.

त्यावर १० लाख रुपये रोख रक्कम भरतो असं केम्पेगौडा सेल्समनला म्हणाले. यावरून सेल्स टीमने जाणूनबुजून शेतकऱ्याची खिल्ली उडवली. १० लाख रुपये तर लांब राहिले तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समनने त्यांची खिल्ली उडवली. अर्ध्या तासात १० लाख रुपये घेऊन या आजच गाडीची डिलीव्हरी करू असं सेल्समन म्हणाला.

त्यानंतर केम्पेगौडा यांनी त्यांच्या मित्रांना लगेचच १० लाख रुपयांची व्यवस्था करायला सांगितली. अर्ध्या तासाच्या आत या शेतकऱ्याने १० लाखांची रक्कम जमवली. मात्र त्यानंतर सेल्स टीमने कार डिलीव्हरीसाठी आणखी ३ दिवस लागतील असं सांगितलं. शुक्रवारी ही सर्व घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी रविवारी सुट्टी असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना काहीच सहकार्य केले नाही. त्यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र संतापले. त्यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

शेतकऱ्यांनी शोरूमवर हल्लाबोल केला होता. नंतर यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शेतकऱ्यांना शांत केले. सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरुममधल्या अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या मित्राचा अपमान केला आहे, मला कार नको लिखीत माफी हवी आहे, असं केम्पेगौडा म्हणाले. त्यानंतर त्यांनी असं नाही केल्यास शोरूमबाहेर आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. हा वाद पुढे वाढतच चालला आहे. आता पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
पत्नीने न सांगता खरेदी केला मोबाईल, संतापलेल्या पतीने उचचले टोकाचे पाऊल, वाचून हादरा बसेल
राज कुंद्राने सगळ्यांसमोर उघड केले बेडरूममधील सिक्रेट, शिल्पा शेट्टी रागावल्यानंतर म्हणाला ‘सॉरी’
‘ताई उठ ना गं…डोळे उघड, बघ तुझा दादा आहे मी’; महिन्यावर लग्न आलेल्या बहिणीचा भावासमोरच तडफडून गेला जीव
VIDEO: विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान, चाहत्यांनी केली कारवाई करण्याची मागणी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now