शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होण्याची अनेक कारणे तुम्ही ऐकली असतील. कधी हवामानामुळे तर कधी जनावरांच्या फटक्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. मात्र, तेलंगणातील एका शेतकऱ्याने पिकाची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांसाठी एका अस्वलाला भाड्याने ठेवले आहे.
हे अस्वल दिवसभर शेतात पहारा देते आणि इकडे तिकडे फिरत असते. त्याला दिवसाला या कामाची ५०० रुपये मजुरी मिळते. तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यात माकड आणि रानडुकरांची इतकी दहशत आहे की शेतकऱ्यांचे पीक खराब झाले आहे. आता दिवसभर बसून माकडं, डुक्कर पळवणं कुणालाच जमत नाही.
अशा स्थितीत भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने एक अद्भूत मार्ग शोधून अस्वलाला कामावर ठेवलं, ते बघून माकड आणि डुक्कर पिकाच्या आसपासही नाहीत. वास्तविक भास्कर रेड्डी यांनी शेतातून माकडे आणि रानडुकरांना हाकलण्यासाठी अस्वलाचा पोशाख परिधान केलेल्या माणसाला कामावर ठेवले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, ते या माणसाला 500 रुपये रोजची मजुरी देतात आणि शेतात फिरून माकडे आणि रानडुकरांना दूर ठेवणे हे त्याचे काम आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हा व्यक्ती अस्वलाच्या वेशात शेताची रक्षण करत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक शेतकऱ्याच्या युक्तीचे कौतुक करत आहेत तर काहींनी म्हटले आहे की त्याला या कामासाठी जास्त पैसै भेटत आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहीले की, त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले की हा माणूस फक्त अस्वलाचे कपडे घालण्यासाठी दिवसाला 500 रुपये घेतो. त्याच वेळी, इतर वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की हे काम इतके सोपे नाही.
काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की हा अस्वलाचा पोशाख परिधान केलेला व्यक्ती आयटी इंजिनीअर्स आणि फ्रीलान्स लेखकांपेक्षा अधिक कमाई करतो. सध्या या व्हिडीओची सर्व सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या पिकांना वाचवण्यासाठी काय शक्कल लढवतील काही सांगता येत नाही. पण असा प्रयोग याआधी तरी कोणीच केला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
PHOTO: भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्माने ब्रा आणि साडीत ओलांडल्या सर्व मर्यादा, टोन्ड फिगर पाहून व्हाल घायाळ
पुणे हादरलं! १७ वर्षीय अभिनेत्रीवर अश्लील व्हिडीओ बनवून दिग्दर्शकाने केला बलात्कार
मोठी बातमी! ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र झाला मास्कमुक्त, जाणून घ्या कोणकोणते निर्बंध हटवले
नराधमांनी मुक्या जीवालाही सोडलं नाही; गरोदर बकरीवर केला सामूहिक बलात्कार, अशी झाली पोलखोल