World Cup, India, Australia,VIDEO, Rohit Sharma/ भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे खेळला गेला. हा सामना जिंकून सीरीजवर कब्जा करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये संघर्ष सुरू होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 7 विकेट्स गमावून 187 धावांचे लक्ष्य ठेवले.
याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्मा आणि संघाने एक चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली. ज्यानंतर चाहत्यांनी सेलिब्रेट करण्याची संधी सोडली नाही. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते जय श्री रामचा नारा देताना दिसत आहेत.
https://twitter.com/MR4BJP/status/1574055053761347584?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1574055053761347584%7Ctwgr%5E52e09326eeabf4c4031566c81d486ed3eb693c6c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-aus-hyderabad-jai-shriram-slogan%2F
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 10 मालिका जिंकल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यातही चाहत्यांचा उत्साह सातव्या गगनाला भिडला होता.
जेव्हा टीम इंडियाचे फलंदाज मैदानावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या बॉलला झोडत होते, तेव्हा मैदानात बसलेले चाहतेही त्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. या सामन्याचा 18 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते भारतीय डावाचा प्रचंड आनंद घेताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे हैदराबाद स्टेडियमवर गाणे गाताना भारतीय चाहते टीम इंडियाचा खेळ बघत आहेत. ज्यामध्ये चाहते “एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा, जय़ श्री राम बोलेगा” अशा घोषणा देताना पाहायला मिळाले. ज्याला सोशल मिडीयावर लाइक आणि शेअर केले जात आहे.
T20 विश्वचषक 2022 पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. त्याआधी 3 सामन्यांच्या T20 मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी दोन हात करताना दिसले होते. ज्यामध्ये टीम इंडियाने गतविजेता ऑस्ट्रेलियन संघाचा 2-1 ने पराभव केला आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेसोबत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर रोहित शर्मा आणि संघ थेट मेलबर्नला रवाना होईल. जिथे T20 विश्वचषक खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
काहीही झालं तरी भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे, IPL जिंकताच पांड्याचा आत्मविश्वास बळावला
धोनीची भविष्यवाणी ठरली खरी, ‘या’ खेळाडूला मिळाली विश्वचषकात भारताकडून खेळण्याची संधी
Accused of rape on player: संघाला विश्वचषक जिंकवून दिलेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल; १० हजार महीलांवर बलात्कार केल्याचा आरोप